Tumgik
#चाटून
bharatlivenewsmedia · 2 years
Text
आदिवासी महिलेला जीभेनं शौचालय चाटून स्वच्छ करण्यास भाग पाडलं, भाजपाच्या निलंबित महिला नेत्याला अटक
आदिवासी महिलेला जीभेनं शौचालय चाटून स्वच्छ करण्यास भाग पाडलं, भाजपाच्या निलंबित महिला नेत्याला अटक
आदिवासी महिलेला जीभेनं शौचालय चाटून स्वच्छ करण्यास भाग पाडलं, भाजपाच्या निलंबित महिला नेत्याला अटक Seema Patra Arrested : झारखंडमधील एका महिला नेत्याने आदिवाशी महिलेला शौचालय चाटण्यास भाग पाडले होते. याप्रकरणी या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपाच्या एका महिला नेत्यानं घरकाम करणाऱ्या आदिवासी महिलेला शौचालय चाटण्यास भाग पाडल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. याप्रकरणी पोलिसांनी…
View On WordPress
0 notes
rahulmarathiblog · 2 years
Text
आदिवासी महिलेला शौचालय चाटून साफ करायला लावायची ' ही ' भाजपची महिला नेता
आदिवासी महिलेला शौचालय चाटून साफ करायला लावायची ‘ ही ‘ भाजपची महिला नेता
भाजपच्या नेत्यांचे गैरवर्तन अनेकदा समोर आलेले आहे मात्र अनेकदा महिलांनी केलेले गैरवर्तन हे दडवले जाते असाच एक प्रकार सध्या चर्चेत आलेला असून भाजपच्या एका महिला नेत्याने घरकाम करणाऱ्या आदिवासी महिलेला चक्क शौचालय चाटण्यास भाग पाडण्याचा संतापजनक प्रकार झारखंड येथे समोर आलेला आहे. धक्कादायक बाब म्हणजे ही महिला एका माजी आयएएस अधिकाऱ्याची पत्नी आहे. सीमा पात्रा असे तिचे नाव असून सदर प्रकरण उघडकीला…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sakshimarathiblog · 2 years

harishmarathiblog · 2 years

chimnayjoshiblogs · 2 years

rajendrasomani · 2 years

nagarchaufer · 2 years

radhakawaii · 3 years
Text
आई: (जाऊबाई)ने नवीन necklace बनवलाय. काही म्हणजे काहीच चव नाही त्याला
मी आणि भाऊ एकत्र: "मीठ कमी होतं वाटतं." "चाटून पाहिलास का?"
बाबा: *suppressed laughter*
17 notes · View notes
nitinkandharkar · 3 years
Text
गोपाळ काला...
     एकत्र कुटुंब, मोठे कुटुंब ही संकल्पना आता कमी होत चालली आहे. पूर्वीच्या काळी घरात भरपूर लोकं असायची. घरचेच किमान आठ ते दहा लोक असायचे. त्यात येणारे जाणारे, पाहुणे, मित्रमंडळी, नोकर-चाकर यांचीही भर असायची. वाहनांच्या सोयी नसल्यामुळे बरेच जण मुक्कामाला असायचे. घर नेहमी भरलेले असायचे. त्यामुळे सकाळी एकदा का स्वैपाकाचा घाणा सुरू झाला की तो रात्री नऊ दहालाच थांबायचा अन अचानक चार लोकं एक्स्ट्रा आली तरी अन्न कमी पडायचे नाही. त्याकाळी हॉटेल, होम डिलिव्हरी, जंक फूड हे दूर दूर तक कुणाला माहित नव्हते. घरचे सुग्रास जेवण हीच मेजवाणी असायची.
      स्वैपाक कधीच तोलून मापून केला जायचा नाही. त्यामुळे काही वेळा अन्न उरायचे. उरलेल्या पोळ्यांचे काय करायचे हा प्रश्न असायचा. बहुतेक यातूनच उत्पत्ती झाली कुस्कर्‍याची! रात्री उरलेल्या पोळ्यांचे तुकडे करुन त्यात थोडी साखर, कडीपत्ता, कोथिंबीर, तिखट किंवा हिरव्या मिरचीचे तुकडे, मीठ, भाजलेले शेंगदाणे, अन डाळवे घालून कांद्याची फोडणी दिली की जी खमंग डिश तयार होते ती म्हणजे पोळीचा कुस्करा! सोबत दही अन कैरीचे ताजे लोणचे असले तर सोने पे सुहागा!  
या डिशला कुणी पोळीचा कुस्करा, कुणी फोडणीची पोळी, कुटके किंवा चपाती उपमा असे म्हणतात. अजून काही ठिकाणी वेगवेगळी नावे असतील. पण आम्ही मात्र ‘गोपाळकाला’ म्हणायचो. हे नाव कसे पडले माहित नाही. आई म्हणायची म्हणून आम्ही म्हणायचो. खरं तर गोपाळकाला म्हणजे गोकुळ अष्टमीला दही, पोहे, इ. घालून तयार करतात तो प्रसाद. आमच्या लहानपणी उमरग्याला सार्वजनिक गोकुळ अष्टमी आणि दहीहंडी साजरी होत नसायची. त्यामुळे गोकुळ अष्टमीच्या प्रसादाला गोपाळकाला म्हणतात हे मोठे झाल्यावरच समजले.  
तर असा हा आमचा गोपाळकाला, शिळ्या पोळीचा जरी असला तरी अतिशय स्वादिष्ट! प्लेट चाटून पुसून चकाचक व्हायची इतका तो आम्हाला आवडायचा, म्हणजे अजूनही आवडतो. आई रोज सकाळी सर्वांच्या आवडते वेगवेगळे पदार्थ करायची. आलटून पालटून उपमा, शीरा, सुशीला, कांदा पोहे, धीरडे, यासोबतच सातूचे पीठ, लाह्याचे पीठ हे असायचे. संध्याकाळी मेतकुट, तेल, तिखट, मीठ, शेंगदाणे घालून कालवलेले चुरमुरे, त्यासोबत कलिंगडाच्या फोडी, द्राक्ष, चिकू इ. फळे अन उन्हाळ्यात आंबे असायचे. पण हे पदार्थ जरी असले तरी गोपाळकाला ज्या दिवशी असेल त्या दिवशी आम्ही त्यावर अक्षरश: तुटून पडायचो. एकतर त्याची क्वांटीटी पोळ्या किती उरल्यात यावर अवलंबून असायची. त्यामुळे  पहिली डिश घेण्यासाठी आमच्यात चढाओढ लागायची.
गोपाळकाला आजही अनेक ठिकाणी केला जातो, पण पोळीचे तुकडे मिक्सरवर केले जातात. हाताने केलेले तुकडे आणि म���क्सरवर केलेले तुकडे यात खूप फरक आहे. मिक्सरवर भुगा होतो, तर हाताने लहान मोठे तुकडे होतात. अशा लहान मोठ्या तुकड्यांचा गोपाळकाला खायला मस्त लागतो.  त्याकाळी मिक्सर नव्हतेच, त्यामुळे हातानेच पोळ्या कुस्करल्या जायच्या. कढईत फोडणीमध्ये हा कुस्करा टाकून त्यावर पाण्याचा शिडकावा मारला की चर्रर्र आवाज होवून घरभर खमंग वास सुटायचा अन तोंडाला पाणी सुटायचे!      
     पोळीच्या कुस्कर्‍याप्रमाणेच ज्वारी बाजरीच्या भाकरीचा कुस्करा आणि फोडणीचा भातही आम्हाला खूप आवडायचा. दही दुधाची त्याकाळी चंगळ असल्यामुळे दह्याबरोबर कालवून हे खायला खूप आवडायचे. आमची चुलत आते भावंडे उन्हाळ्यात उमरग्याला आली की बर्‍याच वेळा गोपाळकाला व्हायचा. भरपूर लोक घरी असल्यामुळे अन्न उरायचेच, ते आमच्या पथ्यावर पडायचे. मग जे काही उरले त्याचा आमच्या आवडता नाष्टा तयार व्हायचा. काही वेळेस पोळी, भाकरी आणि भात या तिन्हीचे एकत्र मिश्रण करुन गोपाळकाला तयार व्हायचा. असा गोपाळकाला एका मोठ्या टोपल्यात घेवून आम्ही सर्व भावंडे तिसर्‍या मजल्यावर (गच्ची) जावून एकत्र बसून बचाक बचाक हात घालून तो सफाचट करायचो. त्यासोबत शेंगदाणे आणि खारोड्याही असायच्या. उन्हाचा चटका बसेपर्यंत आमचे खाणे आणि खेळणे चालायचे.
     त्याकाळी वेगवेगळ्या लोकांच्या पद्धतीप्रमाणे गोपाळकाल्या प्रमाणेच उरलेल्या पोळ्या भाकर्‍यां पासून अनेक वेगवेगळे प्रकार केले जायचे. आमच्या गल्लीत समोरच्या घरांच्या पत्र्यावर पोळी भाकरीचे असंख्य तुकडे वाळत घातलेले दिसायचे. कशासाठी ते वाळत घातले आहेत हे आम्हाला कळायचे नाही, पण हे तुकडे चांगले वाळून कडक झाले की ते पाण्यात उकळून त्यापासून वरण फळासारखा पदार्थ बनवला जायचा. हे कधी खाण्याचा योग आला नाही, पण पाहिले आहे. अन्न वाया न घालवता त्यापासून असे अनेक स्वादिष्ट पदार्थ पूर्वीच्या काळी बनवले जायचे.      
     आता काळ बदलत चालला आहे. घरात मोजकेच लोक उरले आहेत. येणारे जाणारे कमी झाले आहेत. हम दो हमारे दो म्हणत हम ‘दो’च उरले आहेत. बाकी दो बाहेर देशात आहेत. बाहेरच्या ‘दो’ना शिळे खाणे आवडत नाही. म्हणून कधी एकत्र जमले की सर्वांच्या नावाचा मोजून मापूनच स्वैपाक केला जातो. कोण किती खाणार याचे साचेबद्ध माप ठरलेले आहे, त्यामुळे काही उरायचा प्रश्नच उरला नाही.
     आजच्या पिढीला सोशल मिडियाच्या माध्यमातून हे चांगले, ते वाईट, तसेच भेसळ, प्रदुषण याबाबत घरबसल्या ज्ञान मिळत आहे. त्यामुळे सकाळचे अन्न रात्रीच खाल्ले जात नाही तिथे कालचे उरलेले दुसर्‍या दिवशी खाणे दूरच! आता फास्ट फुडचा जमाना आहे. पफ, व्हेज रोल, पिझ्झा, बर्गर, बार्बेक्यू इत्यादी पदार्थ कोकच्या मदतीने पोटात ढकलायला या पिढीला आवडते. हे फास्ट फुड नक्की कधी बनवलेले आहेत, कशापासून बनवलेले आहेत, ताजे आहेत की शिळे हे हॉटेलमधल्या हायफाय वातावरणामुळे कुणाच्या लक्षातही येत नाही. दृष्टी आड सृष्टी यातच सगळा आनंद!
     काळाप्रमाणे आता बदल होत असला तरी जुन्या पिढीतील बहुतांश लोकांना आजही घरच्याघरी दृष्टीसमोर बनवलेली फास्टफुड डिश ‘गोपाळकाला’ खावीशी वाटते यात दुमत नाही. फक्त शिळ्याला ताजे करण्याचे कसब असलेले मुरलेले हात घरी असायला पाहिजेत, बस...    
नितीन कंधारकर,
औरंगाबाद.  
0 notes
deepakmohite · 4 years
Text
दीपक मोहिते,
विकास हवा पण तो स्थानिकांना भकास करून नको...
ग्रामीण भागात अजून तरी शहरी भागासारखे धकाधकीचे जीवन सुरू झालेले नाही.गावातून वाहणारे नदी-नाले,दूरवर डोंगरात करवंदे,जांभूळ,चिकुची झाडे,अचानक अंगाला चाटून जाणारी खाजखुजली झाडे,दूरवरून कानावर पडणारा कोकिळेचा नादमधुर स्वर,गावातील माळरानावर लगोरी व लपंडाव खेळणारी मुले,मुली,सारं कसं प्रसन्न वातावरण...
गावातून शहरी भागात स्थिरावलेली कुटुंबे,त्यांचे उन्हाळी सुट्टीत आपले जन्मस्थान असलेल्या गावात काही दिवस मुक्कामाला येणं,हे सारं एक वेगळीच अनुभूती असते.परंतु आता नागरीकरणाचे वारे शहरी भागाकडून ग्रामीण भागाकडे वळू लागले आहेत,त्यामुळे गावाचे गावपण आता सिमेंट काँक्रीटच्या जंगलात नाहीसे होण्याची भिती वाटू लागली आहे.विविध महाकाय प्रकल्प,त्यासाठी निर्माण करण्यात येणाऱ्या नागरी वसाहती,आवश्यक असलेले रस्ते,पाणी,जमिनी,पिढ्या न पिढ्या राहणाऱ्या भूमीपुत्रांचे विस्थापन,अशी निरनिराळी संकटे,आता ग्रामीण भागावर घोंगावू लागली आहेत.अशा या वावटळीतून ग्रामीण भागातील जनतेची सुटका होईल,अशी शक्यता नाही.विकासाच्या नावाखाली,सरकार हे सारं करतंय,पण या प्रक्रियेत भूमिपुत्र मात्र नाहीसा होणार आहे.शेती,बागायतीवर या बदलाचा मोठा परिणाम होणार असून नव्या पिढीला आपल्या बापजाद्यानी वर्षानुवर्षे जतन करून ठेवलेला हा पारंपारिक व्यवसाय पुढे पहायलाही मिळणार नाही.बदल हा निसर्गाचा नियम आहे,हा बदल विकासाच्या माध्यमातून होत असतो,पण तो स्थानिकांना भकास करून होता कामा नये,एवढीच ग्रामीण भागातील जनतेची इच्छा आहे,पण त्या इच्छेला सरकार मान देईल,असे वाटत नाही.
Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
“राज्यात एक गट बारा भानगडींचा मॅटिनी शो सुरू झाला असून त्याची…”; मंत्रीमंडळ विस्तारावरुन शिवसेनेचा शिंदे गटाला टोला
“राज्यात एक गट बारा भानगडींचा मॅटिनी शो सुरू झाला असून त्याची…”; मंत्रीमंडळ विस्तारावरुन शिवसेनेचा शिंदे गटाला टोला
“राज्यात एक गट बारा भानगडींचा मॅटिनी शो सुरू झाला असून त्याची…”; मंत्रीमंडळ विस्तारावरुन शिवसेनेचा शिंदे गटाला टोला “या पन्नास जणांना ‘खोकी खोकी’ भरून मध तर आधीच मिळाला आहे, पण नुसती मधात बोटे बुडवून आणि चाटून काय होणार? आता मंत्रीपद हवेच,” असं शिवसेनेनं म्हटलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारमधील पहिल्या मंत्रीमंडळ विस्तारानंतरच नाराजी…
View On WordPress
0 notes
vasainews-blog · 5 years
Text
Vasai News: पालघरमध्ये डोळ्यात स्प्रे उडवून नगरसेवकावर गोळीबार; खांद्याला चाटून ...
For more details visit: http://bit.ly/2D0ZKvo
0 notes
vidrive · 6 years
Text
गोकुलधाम सोसायटीतल्या बबिताजीची पॉर्नस्टार सारखी चुदाई भाग-2
गोकुलधाम सोसायटीतल्या बबिताजीची पॉर्नस्टार सारखी चुदाई भाग-2
हॅलो फ्रेंड्स मी अंकित. मागच्या कहानीत मी सांगितलं की बबीताजीची पॉर्नस्टार सारखी चोदायची खूप इच्छा झाली. मग त्या माझा लंड तोंडात घेऊन चुरपून काढून मला ओरल सेक्स चा आनंद दिला. मग मीही त्यांची चरबीदार पुदि चाटून काढली. त्यानंतर मी त्यांची पुदी हेपून गांड मारली. त्यानंतर त्यांनी माझ्या कडक झालेल्या लंडातून वीर्य काढून आपल्या तोंडावर घेतले. त्यानंतर […]
The post गोकुलधाम सोसायटीतल्या बबिताजीची…
View On WordPress
0 notes
healthandfitness146 · 6 years
Text
सिद्धू भाजपात असते तरी ‘स्वबळावर’ पाकडय़ांची चाटून आले असते – उद्धव ठाकरे
सिद्धू भाजपात असते तरी ‘स्वबळावर’ पाकडय़ांची चाटून आले असते – उद्धव ठाकरे
सिद्धू याने पाकिस्तानात जाऊन देशविरोधी कृत्य केले व देशभावनेशी गद्दारी केली हे भाजपने सांगण्याची गरज नाही
from LoksattaLoksatta https://ift.tt/2MKVB4C
View On WordPress
0 notes
Tumblr media
Book Your Service On http://khfm.co.in on This #HARTALIKA महाराष्ट्रातील तमाम महिला भाविकांना #हरतालिकेच्या हार्द्दिक शुभेच्छा #गणेशचतुर्थींच्या आदल्या दिवशी म्हणजे भाद्रपद शुद्ध तृतियेला "#हरतालिका` असे म्हणतात. या दिवशी पार्वती मातेची पूजा महिला करतात. हरतालिका या शब्दाची फोड "हरित` म्हणजे "हरण` करणे आणि "आलिका` म्हणजे "आलिच्या`-मैत्रिणीच्या असा आहे. मैत्रिणींच्या साह्याने पार्वतीने केलेले शंकराचे हरण, असा या शब्दाचा अर्थ आहे. हिंदू कुमारिका आपल्याला हवा असलेला, आपल्या मनासारखा पती मिळावी म्हणून "हरतालिका` हे व्रत अत्यंत मनापासून मनोभावे करतात. काही जणी हे व्रत कडक करतात. आपल्याकडे विवाहित स्त्रिया हे व्रत करतात. विवाह झाल्यानंतर इच्छित पती मिळाल्यानंतर ही करतात कारण एकदा घेतलेले शंकराचे व्रत मोडू नये अशी महिलांची श्रद्धा असते म्हणून त्याही हे व्रत आजन्म करतात. हिमालयाचा राजा हिमवान याची पार्वती ही कन्या. पर्वताची कन्या म्हणून तिचे नाव "पार्वती` असे ठेवण्यात आले. तिचे लग्न कोणाबरोबर करावे अशी काळजी त्याला लागली होती. एकदा नारदमुनी हिमवानाकडे आले आणि त्याला म्हणाले, "हे पर्वतश्रेष्ठा ! तुझ्या या सुस्वरुप मुलीला मागणी घालण्यासाठी भगवान विष्णूंनी मला तुझ्याकडे पाठविले आहे. ते ऐकून हिमवानाला आनंद झाला. त्याने पार्वतीला ती बातमी सांगितली. पण पार्वतीने मनोमन कैलासराणा शंकराला पती म्हणून वरले होते. तसे प्रत्यक्ष पित्याला स्पष्टपणे सांगण्याचे धैर्य तिला झाले नाही. तिने आपल्या मैत्रिणींबरोबर आपल्या पित्याला निरोप पाठवला. "तुम्ही माझा दुसऱ्या कोणाबरोबरही विवाह करून दिला तर मी जीव देईन.` पार्वती आपल्या मैत्रिणींसह अरण्यात निघून गेली. तिथे तिने घोर तपश्‍चर्या केली. नदीकाठी वाळूचे शिवलिंग तयार करून ती त्याची पूजा करू लागली. प्रथम ती फक्त झाडाची कोवळी पाने खाऊन राहत होती. पुढे तिने तेही सोडून दिले. त्यामुळे तिला "अपर्णा` असे नाव पडले. तिच्या तपश्‍चर्येने भगवान श्रीशिवशंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी तिला वर मागायला सांगितले. ती म्हणाली, "तुम्ही माझ्या तपश्‍चर्येमुळे खरोखर प्रसन्न झाला असाल, तर माझे पती व्हा.` शंकराने "तथास्तु` म्हटले व निघून गेले. पार्वतीचा शोध घेत हिमवान त्या अरण्यात आला. तिला त्याने घर सोडून येण्याचे आणि तपश्‍चर्येचे कारण विचारले. तेव्हा तिने आपला दृढ निश्‍चय आपल्या वडिलांना सांगितला. भगवान श्रीशंकरांनी दिलेला वरही सांगितला. तिचा दृढनिश्‍चय, श्रद्धा पाहून हिमवानाने तिचा विवाह भगवान श्री शंकराशी करून दिला. पार्वतीची निष्ठा आणि श्रद्धा व भक्ती यांचा विजय झाला. पार्वतीच्या शंकरावरील निष्ठेमुळे, प्रेमामुळे शंकराला "पार्वतीपती` असे नामाभिधान पडले. इच्छित पती शंकराची प्राप्ती पार्वतीने आपल्या मैत्रिणींच्या साह्याने प्राप्त करून घेतली. पार्वतीने आपला वर कडक तपश्‍चर्येने मिळविला. त्याप्रमाणे मनाजोगता पती मिळावा म्हणून हिंदू कुमारिका, महिला हे व्रत श्रद्धापूर्वक करतात. या दिवशी दिवसभर उपवास करतात. काही जणी तर दिवसभरात पाण्याचा थेंबही तोंडात घेत नाहीत. रात्री 12 वाजता बेलाचे पान चाटून, काही जणी रुईच्या पानावर मध लावून ते पान चाटून, तर कोणी खडीसाखर, केळी यांसारखे अगदी थोडेसेच खाऊन उपवास करतात. अर्थातच ज्यांना इतके कडक व्रत करता येत नाही. त्या स्त्रिया उपवासाचे पदार्थ खाऊन व्रत करतात. या व्रताच्या वेळी स्वच्छ केलेल्या जागेवर एका जागी चौरंग ठेवतात. केळीच्या खांबांनी चारही बाजूंनी सुशोभित केलेल्या चौरंगावर पार्वती आणि शंकराची स्थापना करून त्याची षोडशोपचारे पूजा करतात. धूप-दीप, नैवेद्य दाखवून वेगवेगळ्या प्रकारची पत्री (पाने), फुलांची पूजा केली जाते. धूप-दीप, निरांजन दाखविला जातो. हरतालिकेच्या पूजेत जी पत्री वाहतात. त्यात जाई, शेवंती, पारिजातक , तुळशी, रुई, शमी, दुर्वा, आघाडा, चाफा, केवडा, डाळिंबाची पाने वाहतात. मनोभावे प्रार्थना करतात. "सखे पार्वती, तुला जसा इच्छित वर मिळाला तसा आम्हाला मिळू दे. अखंड सौभाग्य लाभू दे`, अशी प्रार्थना करून आरती केली जाते.या दिवशी पूजा झाल्यावर सुवासिनी, कुमारिका रात्रभर जागरण करतात. झिम्मा, फुगडी, टिपऱ्या, गोफ इत्यादी खेळ खेळतात. 
Book Your Service On http://khfm.co.in on This #HARTALIKA