Tumgik
#महत्वाची बातमी
bharatlivenewsmedia · 2 years
Text
बाप्पाही म्हणतोय... वाचाल तर वाचाल, दादरच्या मंडळाची हटके सजावट
बाप्पाही म्हणतोय… वाचाल तर वाचाल, दादरच्या मंडळाची हटके सजावट
बाप्पाही म्हणतोय… वाचाल तर वाचाल, दादरच्या मंडळाची हटके सजावट दोन वर्षांनंतर गणेशोत्सव जल्लोषात साजरा केला जात आहे. घरो-घरी तर उत्साह पाहायला मिळतच आहे. पण यंदा सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये देखील उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ समाज प्रबोधनाचे संदेश देणारे देखावे सादर करतात. अशापैकीच एक आहे दादर इथला राधाकृष्ण निवास सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ. गणपती हे बृद्धीचे दैवत…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mhadalottery2023 · 6 months
Text
गृहकर्ज घेताय? थांबा, बिल्डरने बँकेतून उपलब्ध करून दिलेल्या गृह कर्जाचे फायदे व तोटे; पहा महत्वाची बातमी I Home Loan
महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला कोणती बँक गृहकर्ज देईल? त्या बँकेने दिलेल्या कर्जाची नेमकी टक्केवारी...
Tumblr media
0 notes
journalist27 · 9 months
Text
दीपक मोहिते,
सूर्यातीर,
ग्रामीण भागातील शाळांमध्ये अंधाराचे साम्राज्य,व्यवस्थेवर प्रश्न निर्माण करणारे,
दोन दिवसांपूर्वी एक धक्कादायक बातमी आपल्या कानावर पडली.आपले मायबाप सरकार ग्रामीण भागातील शिक्षणाच्या बाबतीत किती गंभीर आहे,हे आपण सारे आजवर अनुभवत आलो आहोत.ग्रामीण भागातील शांळामध्ये पुरेसे शिक्षक नाहीत,वर्गखोल्या नाहीत,विद्यार्थ्यांना पिण्यासाठी धड पाणी नाही,मुलींसाठी स्वच्छतागृहे नाहीत.इ.समस्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या पाचवीला पूजल्या आहेत.यंदाचे हे वर्ष अमृतमहोत्सवी वर्ष आहे.गेल्या ७५ वर्षात विविध क्षेत्रात देशाने सर्वांगीण प्रगती केली.विज्ञान व तंत्रज्ञान या क्षेत्रात आपण जी कामगिरी केली,त्याचे दृष्यपरिणाम आपण काल अनुभवले.आपले चांद्रयान-३ यशस्वीरित्या चंद्राकडे झेपावले.पुढच्या महिन्यात ते चंद्रावर उतरेल असा अंदाज आहे.आपल्या शास्त्रज्ञानी मिळवलेले हे यश नक्कीच कौतुकास्पद आहे.आज आपली अनेक मुलं इस्रो व अमेरिकेच्या नासा अंतराळ संशोधन केंद्रात महत्वाची जबाबदारी पार पाडत आहे.
हे सांगण्यामागचा उद्देश असा कि ही जी सर्वांगीण प्रगती साध्य होण्यामागे केवळ शिक्षण ही एकमेव व्यवस्था आहे.पण ती अधिक सक्षम व्हावी,यादृष्टीने गेल्या ७५ वर्षात सरकारकडून प्रामाणिकपणे प्रयत्नच झाले नाहीत.शहरी भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या सोयी-सुविधा उपलब्ध करण्याकडे प्रत्येक सरकारने लक्ष दिले,ग्रामीण भागातील विद्यार्थी मात्र कायम उपेक्षित राहिला.२१ व्या शतकात आता ग्रामीण भागही कात टाकू लागला आहे.पण त्यास योग्य ती गती मिळालेली नाही.ग्रामीण भागातील विद्यार्थी,शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात सामील होण्यासाठी कसाबसा धडपडतोय,पण सरकारकडून त्याला मदतीचा हात पुढे करण्यात येत नाही.
पालघर या आदिवासी जिल्ह्यातील सुमारे साडेचारशे जिल्हा परिषदेच्या शाळांचा वीजपुरवठा बिल न भरल्यामुळे महावितरणने खंडित केला.सुमारे ७५ लाख रु.चे बिल थकल्यामुळे ही कारवाई करण्यात आली.या बिलापोटी सरकार जे अनुदान देते ते २०१९ पासून देण्यात आले नाही,असे शिक्षण विभागाचे म्हणणे आहे.लाखो कोटी रु.चे अंदाजपत्रक असलेले आपले राज्य सरकार ७५ लाख रु.देऊ शकत नाही,ही बाबच मुळात शरमेची आहे.हे केवळ पालघर जिल्ह्यातच अस घडलं नाही तर इतर जिल्ह्यातही अशीच स्थिती आहे.पुणे-७९२,सातारा-३१३,जळगाव-२४८,कोल्हापूर-१४८ एवढ्या मोठ्या संख्येने असलेल्या जिल्हा परिषद शाळांमध्ये गेल्या काही वर्षात विजेची बिले भरली नाहीत,म्हणून वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता.याव्यतीरिक्त अन्य जिल्ह्यातही अशीच स्थिती आहे.मंत्रालय व मंत्र्यांचे बंगले याची कोट्यवधी रु.ची वीजबिले वेळेवर भरणारे सरकार शाळांची वीजबिले भरत नाही,यासारखे दुसरे दुर्देव नसावे.उन्हाळ्यात या मुलांची काय अवस्था झाली असेल,याची कल्पनाही करवत नाही.एकीकडे खोक्याचा वारेमाप वापर सुरू असताना,आमदार,खासदार मंत्र्यांना वीजबिलात भरमसाठ सवलती दिल्या जातात तर दुसरीकडे ग्रामीण भागातील विद्यार्थी मात्र घामाघूम होत शिकतोय,हे चित्रच मुळात आपल्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे करणारे आहे.
आजही अनेक जिल्हा परिषद शाळांना स्वतःच्या मालकीच्या वास्तू नाहीत,अनेक शाळांमध्ये वर्गखोल्या नसल्यामुळे शिक्षक एकाच वर्गात दोन इयत्तांच्या विद्यार्थ्यांना शिकवत असतात.अपुरा शिक्षक वर्ग,वर्गखोल्या नाहीत,वीजपुरवठा खंडित,अशा स्थितीत मुलं शिकणार कशी ? यावर एकाही सरकारने आजवर उपाययोजना करणे टाळले.त्यामुळे ग्रामीण भागात साक्षरतेचा वेग आता मंदावला आहे.विद्यार्थ्यांची गळती,हे फार मोठे संकट असून ते रोखण्यासंदर्भात राज्य शासनाचे शिक्षण विभाग संवेदनशील नाही,ही खऱ्या अर्थाने दुर्देवाची बाब आहे.दुसरीकडे खाजगी शाळांचे पीक मात्र जोमात आले आहे.जिल्हा परिषद शाळा ओस पडत आहेत तर दुसरीकडे खाजगी शाळा बेडकासारख्या फुगत चालल्या आहेत.
ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्थेची दुरावस्था का होतेय ? याचा विचार होण्याची गरज आहे.विजबिलापोटी देण्यात येणारे अनुदान रोखणारे झारीतील शुक्राचार्य कोण आहेत,अशांना हुडकून त्यांच्यावर कारवाई होणे आवश्यक आहे.गावागावात शिक्षण समित्या कार्यरत आहेत.या समित्यांच्या सदस्यांनी गावातील सरपंच व ग्रामसेवकाना थकीत वीज बिलसंदर्भात जाब विचारायला हवा होता.वास्तविक पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या स्थानिक सदस्यांनी या ज्वलंत समस्येचा आजवर पाठपुरावा केला असता तर अशी नामुष्कीची पाळी आली नसती.
एकीकडे आपण चंद्रावर पाय ठेवण्यासाठी अब्जावधी रु.खर्च करतो,तर दुसरीकडे शाळांची विजबिले वर्षानुवर्षे भरत नाही,याची सांगड कशी घालायची ? जी अवस्था जिल्हा परिषद शाळांची तीच अवस्था आश्रमशाळा व अंगणवाड्याची आहे.मग अस वाटत कि चंद्रावर जाण्यासाठी होणारा अवाढव्य खर्च कशासाठी ? आज २१ व्या शतकात ग्रामीण भागातील जनतेला कुपोषणमुक्त जीवन,पाणी,
शिक्षण,आरोग्य व दोन वेळचे जेवण,यासाठी जीवन मरणाचा संघर्ष करावा लागत आहे.हे विदारक चित्र बदलण्याचे कोणी प्रयत्न केले नाहीत,आणि पुढेही होतील,असे वाटत नाही.पालघर जिल्ह्यात विक्रमगड म्हसेपाडा या आदिवासी पाड्यावरील चिमुकली वेळीच उपचार न मिळाल्याने मृत्युमुखी पडते,हे कसले लक्षण आहे.या व्यवस्थेला आपण प्रगल्भ लोकशाही व्यवस्था म्हणावे का ? मंत्र्यांच्या दालनावर सरकार वर्षाकाठी हजारो कोटी रु.खर्च करत असते,पण ग्रामीण भागातील शाळांची विजबिले भरण्यास टाळाटाळ करते.या व्यवस्थेत सुधारणा होईल," सबका साथ,सबका विकास," ही संकल्पना प्रत्यक्षात उतरेल,अशी शक्यता नाही.आपण महासत्ता बनण्याची स्वप्ने पाहत आहोत.आपला देश,आत्मनिर्भर व डिजिटल इंडिया होण्याच्या मार्गावर आहे,असा डिंगोरा सतत पिटला जातो,पण प्रत्यक्षात ग्रामीण भागात वास्तव काय आहे ? यावर सरकारने आत्मपरीक्षण करायला हवे.आजवरच्या प्रत्येक सरकारचा केवळ शहरी भागावर फोकस राहिला,त्यांना खरा " भारत खेड्यात," आहे,हे महात्मा गांधी यांचे म्हणणे कधीच पटले नाही.त्यामुळे पाच ट्रीलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेची आपण जी स्वप्ने पाहत आहोत,ती व्यर्थ आहेत.ग्रामीण भागातील निरक्षरता कायमची नष्ट करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारे शिक्षण व्यवस्था मजबूत करण्यासाठी दमदार पावले उचलत नाही,तोवर ग्रामीण भा���ातील तरुणाईला देशाच्या मुख्य प्रवाहात आणणे शक्य होणार नाही.
Tumblr media
1 note · View note
loksutra · 1 year
Text
Grampanchayat Yojana yadi : आपल्या गावातील ग्रामपंचायत मध्ये चालू असलेले योजनेची संपूर्ण यादी पहा एका क्लिकवर
Grampanchayat Yojana yadi नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे तुमचा आपल्या वेबसाईटवर मित्रांनो तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची बातमी आलेली आहे कारण या पोस्टमध्ये आपण तुम्हाला तुमच्या गावातील ग्रामपंचायत मधील सरकारच्या विविध योजना चालू आहे त्या बद्दल संपूर्ण माहिती देणार आहोत त्यामुळे तुम्ही या पोस्टला संपूर्ण वाचावी जेणेकरून तुम्हाला या बद्दल संपूर्ण माहिती मिळेल. सर्व गावातील ग्रामपंचायत यादी येथे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years
Text
No Homework: विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी, राज्य सरकार गृहपाठ बंद करण्याचा निर्णय घेण्याच्या तयारीत
No Homework: विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी, राज्य सरकार गृहपाठ बंद करण्याचा निर्णय घेण्याच्या तयारीत
No Students Homework: राज्यात शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर विविध विभागांमध्ये महत्वाचे निर्णय घेतले जात असल्याचे पाहायला मिळत आहे. दहीहंडी, गणेशोत्सव काळात आपण असे अनेक निर्णय पाहिले. दरम्यान शिक्षण विभागात देखील एक ऐतिहासिक निर्णय होत आहे. शालेय विद्यार्थ्यांना दिला जाणार होमवर्क आता बंद होणार आहे. राज्य सरकारने यासंदर्भात निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.विद्यार्थी आणि पालकांसाठी अत्यंत महत्वाची…
Tumblr media
View On WordPress
0 notes
besthomeshop · 2 years
Text
तूमच्या बिल्डींगमध्ये वॉचमन नाहीये, मग ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची
तूमच्या बिल्डींगमध्ये वॉचमन नाहीये, मग ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची
New video about तूमच्या बिल्डींगमध्ये वॉचमन नाहीये, मग ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची published by LNN (Local News Network) on 2022-07-09 17:58:00 https://www.youtubepp.com/watch?v=dLiFsgd_h6s Views Ratings Video Time Video Likes Video Author 84 5.00 00:03:27 1 LNN (Local News Network)
Tumblr media
View On WordPress
0 notes
snehalshelote · 2 years
Link
0 notes
swetamarathinews · 2 years
Text
1 note · View note
krantinewsin · 2 years
Text
एलआयसी आयपीओ च्या प्रतिक्षेत असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी
0 notes
granddreamerkingdom · 2 years
Text
AAI मध्ये विविध पदांची भरती, १ लाखपर्यंत मिळेल पगार
AAI मध्ये विविध पदांची भरती, १ लाखपर्यंत मिळेल पगार
AAI recruitment: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. भारतीय विमान प्राधिकरणामध्ये (Airports Authority of India, AAI) विविध पदांची भरती केली जाणार आहे. एअरपोर्ट अथॉरीटी ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइटवर यासंदर्भात नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. एअरपोर्ट…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rebel-bulletin · 2 years
Text
मुलांनो, यंदा मामाच्या गावाला उशिरा जायचं! शाळांच्या एप्रिलमधील उन्हाळी सुट्ट्या रद्द, फक्त अभ्यास!
मुलांनो, यंदा मामाच्या गावाला उशिरा जायचं! शाळांच्या एप्रिलमधील उन्हाळी सुट्ट्या रद्द, फक्त अभ्यास!
मुंबई : विद्यार्थी आणि पालकांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी आहे. कोरोना काळात (Corona) मागील दोन वर्षात अधिकाधिक काळ शाळा बंदच होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांचं मोठं शैक्षणिक नुकसान झालं. हे नुकसान भरुन काढण्यासाठी शालेय शिक्षण विभागानं (School Education Minister) एक मोठा निर्णय घेतलाय. अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी शाळांची यंदाची उन्हाळी सुट्टी (Summer Vacation) रद्द करण्यात आलीय. एप्रिल महिन्यातही…
Tumblr media
View On WordPress
1 note · View note
bharatlivenewsmedia · 2 years
Text
पेण येथील गणेशमूर्तीच्या भौगोलिक मानांकनासाठी प्रस्ताव
पेण येथील गणेशमूर्तीच्या भौगोलिक मानांकनासाठी प्रस्ताव
पेण येथील गणेशमूर्तीच्या भौगोलिक मानांकनासाठी प्रस्ताव पेण तालुक्यातील साडेपाचशे गणेश मूर्ती कारखान्यांमधून सुबक गणेश मूर्ती बनवण्याचे काम वर्षभर सुरू असते. हर्षद कशाळकर, लोकसत्ता अलिबाग : ग्रेट मिशन ग्रुप कन्सल्टन्सीच्या वतीने भौगोलिक मानांकनासाठी (जीआय) रायगड जिल्ह्यातील पेण येथील गणेश मूर्तीचा प्रस्ताव चेन्नई येथील जीआय नोंदणी कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे, लवकरच त्यास मान्यता मिळेल अशी…
View On WordPress
0 notes
ironcyclegalaxy · 2 years
Text
गरोदर होण्याचे योग्य वय / What is the right age for getting pregnant?
लेख लिहिण्यास कारण की''राखी सावंत' आपली मराठी नटी हो..... 'बिग बॉस' मधली वय वर्ष ४२ गरोदर होणार ही बातमी वाचली.आणि आता माझ्या पेशंट....
१.'श्रुतिका' वय वर्ष बत्तीस नुकताच विवाह झालेला सडपातळ उंच सुडौल म्हणजे तिच्याकडे बघून वाटत नाही की ती सध्या बत्तीस वर्षाची आहे क्लिनिक मध्ये मला भेटायला आली होती कारण तिला अजून दोन वर्ष तरी मूल नको होते त्यासाठी लागणाऱ्या योग्य गर्भनिरोधकांचे मार्गदर्शन तिला हवे होते.
२. 'रावी' वय वर्ष २८ लग्नाला दोन वर्षे झाली होती आणि तिच्या वैद्यकीय तपासण्यांनंतर तिला टेस्ट ट्यूब बेबी हीच ट्रीटमेंट सांगण्यात आली होती.
३. 'नम्रता' वय वर्ष 30 सध्या गरोदर होती परंतु अजून एक वर्ष तरी तिला मूल नको होते त्यामुळे गर्भपात करून घेण्याची तिची इच्छा होती.
वरील तिघींचा विचार करताना एक गोष्ट लक्षात आली की या तिघींनी त्यांच्या आयुष्याचे आर्थिक दृष्टीने योग्य असे वेळापत्रक बनवले होते म्हणजे लग्नानंतर साधारण दोन वर्ष व्यवस्थित जम बसल्यानंतर मग गरोदर व्हावे आणि मुलाची जबाबदारी स्विकारावे असा त्यांचा विचार होता आणि त्यामध्ये चुकीचे असे काहीच नव्हते परंतु एक महत्त्वाची गोष्ट या मुली वेळापत्रक तयार करताना विसरल्या होत्या ते म्हणजे त्यांचे 'वय'!
आपल्याकडे सर्वसाधारणपणे लग्नानंतर दोन वर्षांनी 'मूल' होऊ देण्याविषयी विचार करण्याचे नवीन लग्न झालेली जोडपी ठरवतात. ही दोन वर्षे एकमेकांबरोबर जमवून घेणे आणि त्यांचा आर्थिक दृष्ट्या जम बसवणे यादृष्टीने त्यांनी ठरवलेली असतात. या सर्व बाह्य गोष्टींचे प्लॅनिंग किंवा वेळापत्रक ठरवताना आपल्या शरीराचे ही एक घड्याळ असते(biological clock) आणि त्याप्रमाणे योग्य वेळेला योग्य गोष्टी होणे गरजेचे असते हे कित्येक जोडप्यांच्या लक्षातच आलेले नसते. ही गोष्ट लक्षात न येण्याचे मुख्य कारण म्हणजे आपल्याकडे असणारा 'प्रजननक्षमता आणि लैंगिक' (fertility and sexual)शिक्षणाचा अभाव!
इंग्लंड सारख्या देशात ज्या वेळेला वंध्यत्वाचे(infertility) प्रमाण वाढायला लागले त्याकाळी वंध्यत्वाच्या(infertility) या वाढत्या प्रमाण मागची कारणे शोधून काढण्यासाठी अभ्यास करण्यात आला त्यावेळी असे लक्षात आले की बहुतांश जोडप्यांना वंध्यत्व आणि कमीप्रजनन क्षमता (subfertility)यावर वाढत्या वयाचा अतिशय मोठा प्रभाव असतो हे माहीत नव्हते. या अभ्यासातील निष्कर्षाला अनुसरून इंग्लंड मधील वंध्यत्वाचे प्रमाण कमी करण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्या यामधील सर्वात महत्वाची उपाययोजना म्हणजे मुलामुलींना योग्य वयात लैंगिक शिक्षणाबरोबरच प्रजननक्षमतेच्या विषयी शिक्षण देण्यावर भर देण्यात येऊ लागला.(targeted education about fertility potential)
मुळातच मूल असावे की नाही हा ज्या त्या जोडप्याचा वैयक्तिक प्रश्न आहेत परंतु मूल असावे असे वाटत असेल तर जोडप्याच्या प्रजननक्षमतेवर (fertility potential)वयाचा होणारा परिणाम हा मुला-मुलींना माहीत असणे गरजेचे आहे.
जेव्हा आपण प्रजनन क्षमतेविषयी विचार करतो त्या वेळेला कोणत्याही स्त्रीचे वय हे दोन प्रकारे मोजावे लागते
१. शारीरिक वय २. अंडाशयाचे वय(Ovarian age) शारीरिक व याविषयी आपण सर्वजणी जाणता पण अंडाशयाचे वय(Ovarian age() म्हणजे काय हे आज जाणून घेऊ या. तुम्हाला माहित असेलच की स्त्रीबीज(ovum or eggs) हे अंडाशयामध्ये(inside ovary) तयार होत असतात आणि हे स्त्री बीज चांगले असणे हे 'उत्तमप्रजननक्षमतेसाठी'(good fertility of couple) आवश्यक असते
शारीरिक वया बरोबरच अंडाशयाचे वयही वाढते आणि हळूहळू स्त्रीची प्रजनन क्षमता कमी कमी होऊ लागते सरळ सरळ नियम! परंतु कित्येक वेळा अंडाशयाचे वय हे शरीराच्या वया पेक्षा जास्त असू शकते आणि त्यामुळे स्त्रीची प्रजननक्षमता (fertility)ही शारीरिक वय कमी असूनही लवकर लवकर कमी होत जाते याच कारणांमुळे कित्येक स्त्रियांना शारीरिक वय कमी असताना रजोनिवृत्ती(menopause) येते कारण जरी त्यांचे शारीरिक वय कमी असले तरी अंडाशयाचे वय मात्र पटापट वाढलेले असते.
जसे अंडाशयाचे वय वाढते तसे त्यामध्ये निर्माण होणाऱ्या स्त्रीबीज यांची संख्या(quantity) तसेच गुणवत्ता(quality) कमी कमी होत जाते त्यामुळे प्रजननासाठी आवश्यक असणारी उत्तम स्त्रीबीजे अशा स्त्रियांमध्ये तयार होत नाहीत. याचा परिणाम म्हणून अशा स्त्रियांना गरोदर राहण्यामध्ये अडचणी येतात
अंडाशयाच्या या वयाबद्दल आणि त्याच्या कमी होत जाणाऱ्या प्रजनन क्षमतेविषयी 'सेलिब्रेटी' नेहमीच जागरूक आणि काळजीत असतात म्हणून आपण नेहमी बातम्या वाचतो की अमुक अमुक नटीने तिचे स्त्रीबीज योग्य वयातच शरीराबाहेर काढून ठेवले आहेत आणि आता ती गरोदर राहू इच्छीते तेव्हा आता ती त्या स्त्रीबिजांचा वापर करणार आहे.(म्हणूनच आपली 'राखी सावंत' ४२ व्या वर्षी गरोदर होऊ शकत होती) वैज्ञानिक प्रगतीमुळे हे आता शक्य झाले आहे आणि नवीन पिढी या विषयी जाणून घेण्यासाठी उत्सुक आहे. (Preservation of eggs)
आता पुढचा प्रश्न असा आहे की मग ह्या अंडाशयाच्या वया विषयी आपण जाणून घेऊ शकतो का? तर या प्रश्नाचे उत्तर 'हो' असे आहे काही महत्त्वाच्या तपासण्या करून तुम्ही तुमच्या अंडाशयाच्या क्षमतेविषयी जाणून घेऊ शकता . या चाचण्या जरी अगदी शंभर टक्के खऱ्या नसल्या तरी आपल्याला साधारणपणे या चाचण्यांवरून आपल्या 'अंडाशयाच्या वयाचा' अंदाज येऊ शकतो. नैसर्गिकरित्या गरोदर राहण्यासाठी नव्हे तर पुढे जाऊन 'टेस्टट्यूब बेबी' सारख्या उपाययोजनांची मदत घ्यावी लागली तरी त्यामध्ये सुद्धा अंडाशयाच्या वयाला महत्व आहे कारण टेस्ट ट्यूब बेबी सारख्या उपाययोजनांमध्ये सुद्धा चांगल्या प्रतीचे स्त्रीबीज मिळणे हे अंडाशयाच्या वयावरच अवलंबून असते.
तर मग गरोदर होण्यासाठी योग्य वय कोणते? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी जगातील वेगवेगळ्या मनुष्य प्रजातींचा अभ्यास करण्यात आला आणि त्यावरून असा निष्कर्ष निघाला की प्रत्येक प्रजातीसाठी हे वय वेगवेगळे आहे आपल्या भारतीय स्त्रीयांसाठी २४ते २६ वर्ष हा प्रजननासाठी चा उत्तम काळ समजला जातो. कारण या वयात मुलीच्या शरीराची वाढ पूर्ण झालेली असते आणि निरोगी गर्भधारणा करण्याची क्षमता तिला मानसिक आणि शारीरिकरीत्या आलेली असते. सव्वीस वर्षानंतर मात्र भारतीय स्त्रियांची प्रजनन क्षमता हळूहळू कमी होऊ लागते आणि कमी होण्याचा वेग हा प्रत्येक स्त्रीमध्ये कमी-अधिक असतो.
२४ ते २६वर्ष हा काळ नेमका मुलींच्या वयातला करिअरच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा काळ असतो सहाजिकच त्यामुळे मुली आणि मुले सुद्धा करिअरला जास्त महत्त्व देतात. त्यामुळे आपोआपच लग्न आणि लग्नानंतर संतती हे मागे पडत जाते आणि एकदा संततीचा विषय मागे पडायला लागला की मग चार-पाच वर्षे अशीच निघून जातात जाग येते ती तिशी जवळ आल्यावर!
मग आता या सगळ्याचा सुवर्णमध्य कसा साधायचा? तर उत्तर असे आहे की तरुण मुला-मुलींमध्ये मध्ये प्रजननक्षमतेविषयी(fertility potential) जागरूकता निर्माण करणे गरजेचे आहे असे वाटते. लैंगिक शिक्षणाबरोबरच 'प्रजननक्षमतेविषयी' शिक्षण तरुण मुला-मुलींना द्यायला हवे. प्रजननक्षमतेवर होणारा वयाचा परिणाम तसेच इतर अनेक गोष्टी जसे की जीवनपद्धती(lifestyle) वजन जास्त असणे इत्यादी या गोष्टींचा परिणाम तरुण पिढीला माहीत असणे गरजेचे आहे. अशा पद्धतीच्या जागरूकतेला 'टार्गेटेड एज्युकेशन' असे म्हणतात. हे सर्व माहीत करून घेतल्यानंतर तरुण पिढीला खरोखरच मुले असावीत की नाही? असली तर ती किती असावीत आणि कोणत्या वयात असावीत याविषयी निवड करणे सोपे जाईल आणि त्यांना त्यांच्या मताप्रमाणे योग्य तो पर्याय(informed choice) 'योग्यवयात' निवडता येईल. प्रजननक्षमतेवर होणारा वयाचा परिणाम ज्ञात असताना सारासार विचार करून जो काही मार्ग तरुण जोडपी निवडतील त्याचा त्यांना भविष्यकाळात पश्चाताप होणार नाही. वंध्यत्वाकडे बघण्याचा आपल्या समाजाचा दृष्टिकोन, वंधत्वसाठी करावे लागणारे उपचार, त्यासाठी लागणारा वेळ त्यात येणारे अपयश यामुळे तरुण जोडप्यांची जी मानसिक, शारीरिक आणि आर्थिक ससेहोलपट होते ती टाळण्यासाठी योग्य 'वेळ' साधणे हेच खरे उत्तर!
For more details visit us at : https://www.nandiniclinic.com/
1 note · View note
darshaknews · 2 years
Text
ताज्या ऑटो बातम्या बाईकवर मुलांना बसण्यासाठी नवीन वाहतूक नियम मुले बाइकवर बसण्याचे नियम mbh
ताज्या ऑटो बातम्या बाईकवर मुलांना बसण्यासाठी नवीन वाहतूक नियम मुले बाइकवर बसण्याचे नियम mbh
नवी दिल्ली. जर तुम्ही मोटारसायकल चालवत असाल ज्यात मुले पुढे किंवा मागे बसली असतील तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (MoRTH) मुलांच्या सुरक्षेसाठी नियमांमध्ये बदल केले आहेत. वास्तविक, केंद्रातील मोदी सरकारने मुलांना बाइकवर बसण्यासाठी पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित ठेवण्याचे नियम केले आहेत. या नियमाचे पालन न केल्यास मोठा दंड आकारला जाईल. रस्ते वाहतूक आणि…
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years
Text
Crop Loan List शेतकरी कर्ज माफी अपात्र यादी आली पहा तुमचे नाव पहा, अशी करा डाऊनलोड
Crop Loan List शेतकरी कर्ज माफी अपात्र यादी आली पहा तुमचे नाव पहा, अशी करा डाऊनलोड
Crop Loan List महात्मा ज्योतिराव फुले कर्ज माफी योजना या योजनेसाठी बऱ्याच शेतकऱ्यांना लाभ मिळालेला आहे परंतु काही शेतकरी या योजनेपासून वंचित राहिलेले आहेत तरी अशा शेतकऱ्यांसाठी ही महत्वाची बातमी आहे. खाली लिंक वर क्लिक करून यादीत नाव चेक करा  राज्यातील बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांची या योजनेमध्ये नावे नसल्यामुळे शेतकरी Crop Loan List गोंधळात पडले आहेत आणि अशा शेतकऱ्यांसाठी एक चिंतेचा विषय म्हणजे आज…
Tumblr media
View On WordPress
0 notes
gtplnewsakola · 2 years
Text
विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, दहावी व बारावी प्रात्यक्षिक परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, दहावी व बारावी प्रात्यक्षिक परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
ANN & GTPL न्युज नेटवर्क ब्युरो अकोला, न्युज डेस्क दि. 21 जानेवारी :- महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने कडून इयत्ता दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षेचे वेळापत्रक काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आले होते.आता महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षेचे वेळापत्रक जारी केले आहे. इयत्ता बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा येत्या 14…
Tumblr media
View On WordPress
0 notes