Tumgik
#भारत जोडो यात्रेचा मार्ग
loksutra · 2 years
Text
चूप अभिनेत्री पूजा भट्ट राहुल गांधी भारत जोडो यात्रेवर ट्विट करते म्हणते वेदना म्हणजे वेदना आणि नुकसान म्हणजे नुकसान
चूप अभिनेत्री पूजा भट्ट राहुल गांधी भारत जोडो यात्रेवर ट्विट करते म्हणते वेदना म्हणजे वेदना आणि नुकसान म्हणजे नुकसान
चूप अभिनेत्री पूजा भट्ट राहुल गांधी भारत जोडो यात्रेवर ट्विट करते म्हणते वेदना म्हणजे वेदना आणि नुकसान म्हणजे नुकसान ,
Tumblr media
View On WordPress
0 notes
nandedlive · 2 years
Text
सावरकरांना ब्रिटिशांकडून पेन्शन का मिळायची?
Tumblr media
मागील चार ते पाच दिवसांपासून विनायक सावरकर यांच्याबाबतचा वाद चव्हाट्यावर आला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या विधानामुळे भाजप आणि हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. या संघटनांकडून राहुल गांधी यांच्यावर सातत्याने हल्लाबोल करण्यात येत आहे. त्याला आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रत्युत्तर दिले आहे. नाना पटोले म्हणाले की, राहुल गांधी यांनी वि.दा. सावरकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यावर टीका करणा-यांनी सावरकरांना ब्रिटिशांकडून ६० रुपये पेन्शन का मिळत होते, हे आधी स्पष्ट करावे. या आठवड्याच्या सुरुवातीला भारत जोडो यात्रेत राहुल गांधींनी सावरकरांवर केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. सावरकरांनी इंग्रजांना मदत केली आणि भीतीपोटी त्यांनी इंग्रजांना दयेचा अर्ज लिहिला, असा दावा राहुल यांनी केला होता. पुराव्यानिशी बोललो दरम्यान आपण सावरकर यांच्याविषयी जे काही बोललो ते पुराव्यानिशी बोललो. सावरकर यांच्याविषयी भाजपला जे वाटते ते म्हणणे त्यांनी मांडावे. त्याला आमचा विरोध नाही. संविधानाने सर्वांना व्यक्त होण्याचा अधिकार दिला आहे. आमचा मार्ग अहिंसेचा आहे. आम्हाला कोणाला दबावात ठेवायचे नाही. भारत जोडो यात्रेचा उद्देशच द्वेषाच्या विरोधात आहे असे राहुल गांधी यांनी आधीच स्पष्ट केले आहे. Read the full article
0 notes
airnews-arngbad · 2 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 07 November 2022 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – ०७ नोव्हेंबर २०२२ सायंकाळी ६.१० ****
आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांसाठीचं दहा टक्के आरक्षण वैध असल्याचा सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाचा तीन विरुद्ध दोन मतांनी निर्णय.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा आज संध्याकाळी साडेसात वाजता देगलूरमध्ये पोहोचणार.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडून दिलगीरी व्यक्त.
आणि
९६वाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी माजी खासदार दत्ता मेघे यांची निवड.
****
केंद्र सरकारनं लागू केलेलं आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांसाठीचं दहा टक्के आरक्षण, सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठानं तीन विरुद्ध दोन मतांनी वैध ठरवलं आहे. या निर्णयामुळे देशभरात आर्थिक आरक्षण लागू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. केंद्र सरकारनं १०३वी घटना दुरुस्ती करून सवर्ण प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या मागास घटकांना आरक्षण देण्याची तरतूद कायद्यात केली होती. केंद्र सरकारच्या या निर्णयाविरोधात जवळपास ४० याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाल्या होत्या. या याचिकांची सरन्यायाधीश उदय लळित यांच्या अध्यक्षतेखालच्या पाच सदस्यीय घटनापीठानं एकत्रित सुनावणी करुन हे आरक्षण घटनाविरोधी नसल्याचं, यासंदर्भातल्या निकालात स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे. हा निर्णय गोरगरिबांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी नक्कीच उपयोगी ठरणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी ट्वीट संदेशात म्हटलं आहे.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी, सामाजिक न्यायाच्या चळवळीला आर्थिक निकषाचा आयाम देणारा निर्णय अशा शब्दात या निर्णयाचं स्वागत केलं आहे. एका मोठ्या आणि गरजू घटकासाठी विकासाची दारं प्रशस्त झाली असून राजकारणापलीकडे जाऊन या निर्णयाकडे पाहण्याची गरज असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
राज्यातील मराठा आणि अल्पसंख्यांकासह विविध समुदायातील गरीबांना या निर्णयाचा लाभ होणार असल्याचं मत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केलं आहे. ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. आरक्षण हे गरीबांना मदत करण्याच्या मोदी सरकारच्या कामगिरीतील एक महत्त्वाचं पाऊल असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री कारकीर्दीत त्यांनी मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात आरक्षण दिलं होतं, मात्र महाविकास आघाडी सरकारच्या चुकांमुळे सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण रद्द झाल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.
****
५३वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव येत्या २० ते २८ नोव्हेंबर दरम्यान गोव्यात पणजी इथं आयोजित केला जाणार आहे. या महोत्सवात सुवर्ण मयुर स्पर्धेत १५ चित्रपटांचा सहभाग असेल. यात १२ आंतरराष्ट्रीय आणि काश्मीर फाईल्स या भारतीय चित्रपटासह दोन चित्रपटांचा समावेश असेल. या महोत्सवाच्या परीक्षकांमध्ये भारतीय चित्रपट निर्माते सुदीप्तो सेन यांचा समावेश आहे.
****
देशातल्या परिचारिकांना त्यांच्या रुग्णसेवेप्रती २०२१ वर्षासाठीचे राष्ट्रीय फ्लोरेंस नाइटींगेल पुरस्कार आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यामध्ये राज्यात सोलापूर जिल्ह्यातल्या मनिषा जाधव यांचा समावेश आहे. परिचारिका आणि परिचारक समुहाच्या उत्कृष्ट समाजसेवेसाठी हा पुरस्कार दिला जातो. १९७३ या वर्षी केंद्रीय आरोग्य आणि कुटूंब कल्याण मंत्रालयानं या पुरस्कारांची सुरुवात केली आहे.
****
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा आज राज्यात दाखल होत आहे. संध्याकाळी साडेसात वाजता ही यात्रा नांदेड जिल्ह्यातल्या देगलूरमध्ये पोहोचणार असल्याचं, माजी मंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितल. नांदेड जिल्ह्यात ही यात्रा चार दिवस असेल. त्यानंतर हिंगोलीत चार दिवस आणि बुलढाणा जिल्ह्यात या यात्रेचा दोन दिवस मुक्काम राहणार आहे. या काळात राज्यात राहुल गांधी यांच्या दहा कॉर्नर सभा, तसंच दोन जाहीर सभा होणार आहेत. पहिली सभा नांदेड इथं दहा नोव्हेंबरला, तर दुसरी सभा शेगाव इथं १८ नोव्हेंबरला होणार आहे.
****
राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर दिलगिरी व्यक्त केली आहे. मंत्री सत्तार यांनी आपण शब्द मागे घेत असल्याचं सांगत, आपण कुणाचाही अवमान केला नसून कुठल्याही महिलेचं मन दुखावलं असल्यास दिलगिरी व्यक्त करत असल्याचं सांगितलं. ते म्हणाले –
कोणत्याही महिला भगिनीचं मन दुखलं असेल तर मी सॉरी बोलतो. पण महिलांच्या बद्दल मला बोलण्याचा उद्देश नाहीये. जे बोलतात, आम्हाला बदनाम करण्याचा खोके म्हणून प्रयत्न करतात त्यांच्यासाठीचं ते उत्तर होतं. मी कोणत्याही महिला भगिनीला एक शब्दही बोललो नाही. आणि आमच्या पक्षाची ती नीतीपण नाहीये. महिला भगिनींचा सन्मान करणारे आमचे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री आहेत. मी ते शब्द जे महिलांना कुठंतरी मनाला दुखत असेल तर ते शब्द माझे मागे घेतो.
दरम्यान, मंत्री सत्तार यांच्या वक्तव्यानंतर आज राज्यात ठिकठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरु केलं. सत्तार यांच्या मुंबईतल्या शासकीय निवासस्थानाबाहेर देखील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत निषेध आंदोलन केलं.
राज्यातील विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनीही मंत्री सत्तार यांच्या वक्तव्याबद्दल नापसंती व्यक्त केली आहे. काहींनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
****
९६वाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलाच्या स्वागताध्यक्षपदी माजी खासदार दत्ता मेघे यांची निवड करण्यात आली आहे. हे संमेलन विदर्भ साहित्य संघातर्फे आयोजित करण्यात आलं असून वर्धा इथं पुढील वर्षी ३ ते ५ फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे. या साहित्य संमेलनाच्या मार्गदर्शक पदाची जबाबदारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्वीकारली असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. 
****
राज्यात शिष्यवृत्ती विचारात न घेता शुल्क आकारणी करणाऱ्या शिक्षण संस्थांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा राज्याचे तंत्रशिक्षण संचालक डॉ. अभय वाघ यांनी दिला आहे. राज्यात सध्या व्यावसायिक पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू असून यात प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातल्या विद्यार्थ्यांना राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना आणि डॉ.पंजाबराव देशमुख वसतीगृह ���िर्वाह भत्ता विस्तारित योजना लागू करण्यात आली असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
****
अहमदनगर इथं महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळ मुंबई यांच्या वतीनं घेण्यात आलेल्या ६१ व्या राज्यस्तरीय शैक्षणिक अधिवेशनाचा आज समारोप झाला. दोन दिवस चाललेल्या या अधिवेशनात पवित्र पोर्टलद्वारे होणारी शिक्षकांची भरती त्वरित सुरु करावी यासह मुख्याध्यापकांना केंद्रीय शाळेच्या मुख्याध्यापक प्रमाणे वेतन श्रेणी मिळावी, विनाअनुदानित शाळांना प्रचलित नियमानुसार अनुदान टप्पा मंजूर करावा, १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू व्हावी आदी ठराव संमत करण्यात आले. यावेळी विदर्भ मुख्याध्यापक संघांचं या संघात विलीनीकरण करण्याची घोषणा करण्यात आली.
****
बहुचर्चित हर हर महादेव सिनेमा चित्रपटात इतिहासाची मोडतोड करून दाखवण्यात आल्याच्या आरोपावरुन पुणे जिल्ह्यात पिंपरीतलं मंगला चित्रपटगृह आज संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी बंद पाडलं. हर हर महादेव या चित्रपटाचे प्रदर्शन थांबवा, पोस्टर काढून टाका अन्यथा परिणामांना सामोरे जा, असं निवेदन संभाजी ब्रिगेडनं मंगला चित्रपटगृहाच्या संचालकांना दिलं आहे. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या हर हर महादेव या चित्रपटातून जो इतिहास दाखवला आहे, तो चुकीचा असल्याच सांगत संभाजी ब्रिगेडनं त्याला विरोध केला आहे.
****
युवासेना प्रमुख, शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे यांच्या ‘शेतकरी संवाद’ यात्रेची आज अकोला जिल्ह्यातून सुरुवात झाली आहे. राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन ते शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत. आपल्या या भेटीत ते शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर उभं असल्याचं सांगत आहेत. नुकसानीनंतर अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना मदत न मिळाल्याबद्दल सरकारचा निषेध करत ठाकरे सरकार ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करत आहेत. अकोला जिल्ह्यात बाळापूर इथं झालेल्या संवाद यात्रेत ठाकरे यांनी जनतेचे आभार मानत शिवसेनेचे जिल्ह्यातील आमदार नितीन देशमुख यांचा सन्मान केला. याचबरोबर त्यांनी शिंदे गटावर जोरदार टीकाही केली.
****
औरंगाबाद शहरातल्या नागरिकांना भविष्यात चोवीस तास पाणीपुरवठा करण्यासाठीचं नियोजन करण्यात आल्याची माहिती केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी दिली आहे. औरंगाबाद शहरासाठीच्या नव्या पाणी पुरवठा योजने संदर्भात डॉ. भागवत कराड यांनी, संबंधित कंत्राटदार, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि महानगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांसोबत आज आढावा बैठक घेतली. त्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. दर महिन्याला साडेचार किलोमीटरची जलवाहिनी टाकण्याचं काम सध्या सुरु असून यामध्ये वाढ करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
****
0 notes
airnews-arngbad · 2 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 07 November 2022 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – ०७ नोव्हेंबर २०२२ दुपारी १.०० वा. ****
केंद्र सरकारने लागू केलेलं आर्थिक दुर्बल - ई डब्ल्यू एस प्रवर्गाचं दहा टक्के आरक्षण सर्वोच्च न्यायालयानं वैध ठरवलं आहे. हे आरक्षण घटनाविरोधी नसल्याचं, सरन्यायाधीश उदय लळित यांच्या अध्यक्षतेखाल पाच सदस्यीय घटनापीठानं यासंदर्भात निकाल देताना स्पष्ट केलं. केंद्र सरकारने १०३ वी घटनादुरुस्ती करून सवर्ण प्रवर्गातल्या आर्थिकदृष्ट्या मागास घटकांना आरक्षणची तरतूद केली होती. वेगवेगळ्या याचिकांच्या माध्यमातून या आरक्षणाला आव्हान देण्यात आलं होतं. पाच न्यायमूर्तींपैकी तीन न्यायमूर्तींनी आर्थिक आरक्षणाच्या बाजूने निकाल दिला. न्यायमूर्ती महेश्वरी, न्यायमूर्ती बेला त्रिवेदी, आणि न्यायमूर्ती पराडीवाला यांनी आरक्षणाला पाठिंबा दिला. आर्थिक आरक्षण हे घटनेच्या मूलभूत तत्वांचं उल्लंघन करत नाही, हे आरक्षण ५० टक्के आरक्षणाच्या मर्यादेचं उल्लंघनही करत नसल्याचं न्यायमर्ती माहेश्वरी यांनी नमूद केलं.
तर सरन्यायाधीश उदय लळीत आणि न्यायमूर्ती रविंद्र भट यांनी आरक्षणाविरोधात निकाल दिला. न्यायमूर्ती भट यांनी आपल्या निकालात आर्थिक आरक्षणाच्या तरतुदीला विरोध केला.
तीनास दोन अशा बहुमतामुळे देशभरात आर्थिक आरक्षण लागू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वागत केलं आहे. हा निर्णय गोरगरिबांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी नक्कीच उपयोगी ठरणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी ट्विट संदेशात म्हटलं आहे.
****
राष्ट्रीय कर्करोग जागरुकता दिवस आज पाळला जात आहे. कर्करोगाचं निदान, वेळेवर उपचाराचं महत्व लोकांना पटवून देण्याच्या उद्देशानं २०१४ पासून हा दिवस पाळला जातो.
****
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा आज राज्यात दाखल होत आहे. संध्याकाळी साडेसात वाजता ही यात्रा नांदेड जिल्ह्यातल्या देगलूरमध्ये पोहोचणार असल्याचं, माजी मंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितल. नांदेड जिल्ह्यात ही यात्रा चार दिवस असेल. त्यानंतर हिंगोलीत चार दिवस आणि बुलढाणा जिल्ह्यात या यात्रेचा दोन दिवस मुक्काम राहणार आहे. या काळात राज्यात राहुल गांधी यांच्या दहा कॉर्नर सभा, तसंच दोन जाहीर सभा होणार आहेत. पहिली सभा नांदेड इथं दहा नोव्हेंबरला, तर दुसरी सभा शेगाव इथं १८ नोव्हेंबरला होणार आहे.
****
शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि बाळासाहेबांची शिवसेना गटाचे नेते श्रीकांत शिंदे यांची आज औरंगाबाद जिल्ह्यातल्या सिल्लोड इथं सभा होणार आहे. श्रीकांत शिंदे यांची सभा सिल्लोडच्या जिल्हा परिषदेच्या मैदानावर, तर आदित्य ठाकरे यांची सभा आंबेडकर चौकात होणार आहे. एकाच वेळी या सभा होणार असल्यानं औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी सिल्लोड शहरात कडक पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे.
****
राज्यातल्या पर्यटनाला चालना देण्यासाठी उद्या पासून येत्या नऊ नोव्हेंबर पर्यंत होणाऱ्या वर्ल्ड ट्रॅव्हल मार्ट २०२२ मध्ये शासनाचा पर्यटन विभाग सहभागी होणार आहे. साहसी, कृषी, जबाबदार, समृद्ध संस्कृती, वारसा आणि वन्यजीव पर्यटन यावर लक्ष केंद्रीत करणाऱ्या लंडन मधल्या आघाडीच्या प्रवासी भागीदारांशी शासनाचा पर्यटन विभाग संवाद साधणार आहे. पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी ही माहिती दिली. महाराष्ट्रात प्रवास करणं आणि राहणं पूर्णपणे सुरक्षित आहे, याची माहिती आंतरराष्ट्रीय पर्यटकांपर्यंत या माध्यमातून देता येईल असंही पर्यटन सचिव सौरभ विजय म्हणाले.
****
महाराष्ट्र पक्षी मित्र संस्थेतर्फे देण्यात येणाऱ्या २०२२ च्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून, यावर्षीचा पक्षी मित्र जीवन गौरव पुरस्कार, सोलापूर इथले भीमाशंकर कुलकर्णी यांना जाहीर झाला आहे. पक्षी संशोधन पुरस्कार नांदेडचे डॉ. जयवर्धन बलखंडे यांना, पक्षी संवर्धन आणि सुश्रुषा पुरस्कार सोलापूरचे राजकुमार कोळी यांना, तर पक्षी जनजागृती पुरस्कार, गडहिंग्लजचे अनंत बाबू पाटील यांना जाहीर करण्यात आला आहे. अमरावती इथं संघटनेचे अध्यक्ष डॉ. जयंत वडतकर यांनी ही घोषणा केली. पुरस्कारांचं वितरण येत्या ३५ व्या महाराष्ट्र पक्षी मित्र संमेलनात करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
हिंगोली जिल्ह्यात वसमत शहरातल्या मामा चौकात एका कारसह पोलीसांनी एक लाख ३५ हजार रुपयांचा गुटखा ताब्यात घेतला. आज पहाटे सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन महिन्यात पोलीसांनी पाच छापे टाकत सहा लाख रुपयांचा गुटखा साठा जप्त केला.
****
पालघर जिल्ह्यातल्या जव्हार - सिलवासा रोडवर आज सकाळी नाशिक - सिलवासा आणि सिलवासा - जळगाव या दोन एसटी बस समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. या अपघातात जवळपास २० ते २५ प्रवासी जखमी झाले असून, बस चालक गंभीर जखमी असल्याचं सांगण्यात येत आहे. अपघाताचं कारण अद्यापकळू शकलं नसल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
//**********//
0 notes