Tumgik
#तारीख रमजान
airnews-arngbad · 17 days
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 12 April 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १२ एप्रिल २०२४ सकाळी ७.१० मि.
****
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याची अधिसूचना आज जारी होणार; उस्मानाबाद आणि लातूरसह राज्यातल्या अकरा मतदारसंघांचा समावेश
पहिल्या तसंच दुसऱ्या टप्प्यातल्या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांकडून प्रचाराला वेग
मराठवाड्याच्या बहुतांश भागात गारपिटीसह अवकाळी पाऊस; परभणीत वीज पडून दोन ठार
आणि
ईद-उल-फित्र अर्थात रमजान ईद सर्वत्र उत्साहात साजरी; ईदमिलन कार्यक्रमांना प्रारंभ
****
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याची अधिसूचना आज जारी होणार आहे. या टप्प्यात १० राज्यांमधल्या ९४ मतदार संघांचा समावेश आहे. या टप्प्यात महाराष्ट्रातल्या उस्मानाबाद, लातूर, रायगड, बारामती, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले या अकरा मतदारसंघांचा समावेश आहे.
या मतदारसंघात आजपासून १९ एप्रिलपर्यंत अर्ज भरता येतील. २० एप्रिलला अर्जांची छाननी होईल, २२ एप्रिल ही अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असून ७ मे रोजी मतदान होणार आहे.
उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात काल नामनिर्देशनपत्राच्या अनुषंगाने प्रात्यक्षिक सादरीकरण करण्यात आलं. यावेळी जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी उपस्थित होते.
****
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातल्या प्रचाराला आता वेग आला आहे. राज्यभरात सर्वच पक्षांच्या दिग्गज नेत्यांच्या प्रचारसभा होत आहेत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची महाराष्ट्रातली पहिली सभा काल भाजपा उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचारासाठी नांदेड जिल्ह्यात नरसी इथं झाली. राज्यातले शेतकरी, युवा, महिला या सगळ्यांचा विकास फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदीच करू शकतात, असं शहा यावेळी म्हणाले. राज्यातल्या विकासकामांचा त्यांनी आढावा घेतला. हिंगोली इथले महायुतीचे उमेदवार बाबुराव कदम यांच्या प्रचारार्थ शिवसेना नेते अभिनेता गोविंदा यांनी प्रचार फेरी काढली.
बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्ष मायावती यांनी पूर्व विदर्भातल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी नागपुरात सभा घेतली, यावेळी त्यांनी काँग्रेस तसंच भाजपवर टीका केली.
****
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्यात आलापल्ली इथं उमेदवार अशोक नेते यांच्या समर्थनासाठी सभा घेतली. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी यवतमाळच्या वणी इथं चंद्रपूर-आर्णी मतदारसंघाचे उमेदवार राजेश बेले यांच्यासाठी प्रचारसभा घेतली. दरम्यान वंचित बहुजन आघाडीने काल दहा उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली.
****
कोणताही राजकीय पक्ष, निवडणूक उमेदवार, इतर कोणतीही संस्था किंवा व्यक्तींनी मतदानाच्या एक दिवस आधी आणि मतदानाच्या दिवशी राजकीय जाहिरातींचं राज्य आणि जिल्हास्तरावरील माध्यम पूर्व प्रमाणीकरण समितीकडून प्रमाणीकरण करुन घेणं बंधनकारक आहे. पूर्व प्रमाणित केल्याशिवाय कोणतीही जाहिरात मुद्रित माध्यमांमध्ये प्रकाशित करु नये, असे निर्देश निवडणूक आयोगानं दिले आहेत.
****
मतदानासाठी मतदार ओळखपत्राव्यतिरिक्त इतर १२ प्रकारचे पुरावे ग्राह्य धरले जातात, या पुराव्यांमध्ये आधार कार्ड, बँक पासबुक, वाहन चालक परवाना, पॅन कार्ड, आपापल्या आस्थापनेचं छायाचित्रसह ओळखपत्र, पारपत्र, आदी पुराव्यांचा समावेश आहे. याशिवाय सर्व मतदारांना मतदानाच्या किमान पाच दिवस आधी माहितीच्या चिठ्ठ्यांचं निवडणूक कार्यालयाकडून वितरण केलं जातं. मतदारांनी मतदानासाठी जाताना, छायाचित्रासह ओळखपत्र आणि माहितीची चिठ्ठी सोबत ठेवण्याचं आवाहन, निवडणूक अधिकारी कार्यालयानं केलं आहे.
****
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘लोकनिर्णय महाराष्ट्राचा’ हा कार्यक्रम, आकाशवाणीनं सुरू केला आहे. कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण वर्धा लोकसभा मतदार संघाचा आढावा ऐकणार आहोत. संध्याकाळी सव्वा सात वाजता हा कार्यक्रम आपल्याला ऐकता येईल.
****
मराठवाड्यात काल बहुतांश भागात गारपिटीसह अवकाळी पाऊस झाला. परभणी जिल्ह्यात गंगाखेड तालुक्यात इळेगाव इथले बाबू शेळके आणि सोनपेठ तालुक्यात हरिबाई सुरनर यांचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला तर वीज पडल्यानं एक बैल आणि एक शेळी देखील दगावल्याचं वृत्त आहे.
जालना जिल्ह्यात जालन्यासह, बदनापूर आणि भोकरदन तालुक्यात बहुतांश भागात काल सायंकाळी विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली. भोकरदन तालुक्यात सिपोरा बाजार, लिंगेवाडी, दावतपूर भागात गारांचा पाऊस झाल्यानं, फळबागांना फटका बसला तर काही ठिकाणी घरांवरील पत्रे उडाले.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सिल्लोड, कन्नड, सोयगाव तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली, यात उन्हाळी मिरची तसंच काढणीला आलेल्या ज्वारी, बाजरी, मका पीक आणि फळबागांचं मोठं नुकसान झालं. कन्नड तालुक्यात जामडी इथं आणि सोयगाव तालुक्यात निमखेडी इथं वीज कोसळून दोन गायी दगावल्याचं वृत्त आहे.
लातूर जिल्ह्यात काल दुपारी दोन तास वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. बीड जिल्ह्यात काल दुपारनंतर गारपिटीसह अवकाळी पाऊस झाला. सुमारे दोन तास चाललेल्या या पावसामुळे धारुर तालुक्यातल्या लेढी नदीला पूर आला.
हिंगोली जिल्ह्यात हिंगोली तसंच कळमनुरी तालुक्यात काल वादळी वाऱ्यासह गारपीट झाली.
धाराशिव शहर आणि परिसरातही काल संध्याकाळच्या सुमारास अवकाळी पाऊस झाला. या पावसाचा आंबा पिकं तसंच ज्वारी, हरभरा काढणीवर परिणाम झाल्याची भीती वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान, हवामान विभागाने राज्यात आजपासून तीन दिवसांकरता पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या काळात ताशी ५० किलोमीटर वेगाने सोसाट्याचे वारे वाहतील, तसंच तुरळक ठिकाणी विजांच्या कडकटासह वादळी पाऊस पडेल, अशी शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे.
****
ईद-उल-फित्र अर्थात रमजान ईद काल सर्वत्र उत्साहात साजरी झाली. छत्रपती संभाजीनगर शहरात छावणी इथल्या ईदगाह मैदानासह ठिकठिकाणच्या मशिदींमध्ये नमाज अदा करण्यात आली.
परभणी शहरात जिंतूर रोड परिसरातल्या ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठण करण्यात आलं.
बीड शहरात दोन ईदगाह आणि १३ मशिदींमध्ये सामुदायिक नमाज पठण करण्यात आलं. यावेळी विश्वशांती तसंच जिल्ह्यातली दुष्काळी स्थिती निवारणासाठी प्रार्थना करण्यात आली.
हिंगोलीतही ईद-उल-फित्र निमित्त मुस्लिम बांधवांनी सामुहिक नमाज पठण करून उत्साहात रमजान ईद साजरी केली. जालना शहरातल्या जुना जालन्यातल्या कदीम ईदगाह आणि नवीन जालन्यातल्या सदर बाजार ईदगाह मैदानावर सामुहिक नमाज अदा करण्यात आली.
लातूर, नांदेड, धाराशिवसह मराठवाड्यात सर्वत्र रमजान ईद उत्साहात साजरी झाली, सामुहिक नमाज पठणानंतर सर्वांनी परस्परांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. ईदमिलन कार्यक्रमांनाही कालपासून प्रारंभ झाल्याचं दिसून येत आहे.
****
थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त काल त्यांना सर्वत्र अभिवादन करण्यात आलं.
छत्रपती संभाजीनगर शहरात औरंगपुरा परिसरातल्या महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास विविध राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातल्या मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.
नांदेड इथं स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.
बीड जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा प्रशासनाच्यावतीनं महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आलं.
जालना शहरासह जिल्ह्यात महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली. परभणी शहरात जिल्हा परिषद परिसरातल्या महात्मा फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी नागरीकांनी गर्दी केली होती. याठिकाणी लोकसभा निवडणुकीत मतदान करण्यासंबंधी सेल्फी पॉईंट उभारण्यात आले होते.
****
हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी विधानसभा मतदारसंघातल्या दिव्यांग, ८५ वर्षावरच्या आणि अत्यावशक सेवेतल्या २६४ मतदारांच्या मतदानासाठी विशेष सोय करण्यात येणार आहे. १४ आणि १५ एप्रिल रोजी हे पथक संबधित मतदारांच्या घरी जाऊऩ त्यांचं मतदान करून घेणार आहे.
****
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बीड मतदार संघातल्या मतदान यंत्रांचं काल विधानसभा निहाय वाटप करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. वखार महामंडळाच्या गोदामामध्ये जिल्हादंडाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया सुरू आहे.
****
छत्रपती संभाजी नगर इथं दत्ताजी भाले स्मृती समितीच्या वतीने उभारलेल्या 'समर्पण' या वास्तूचं लोकार्पण काल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांच्या हस्ते झालं.
सातारा परिसरात एक एकर भूखंडावर उभारलेल्या या वास्तूत संघाच्या संपर्क कार्यालयासह गरजू विद्यार्थ्यांना निवास, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, स्वयंरोजगार, ग्रामविकास, सेंद्रिय शेती प्रशिक्षण, व्यक्तिमत्त्व विकास, योगाभ्यास आदी प्रशिक्षण तसंच मार्गदर्शन उपलब्ध होणार आहे.
****
लातूर - बीड महामार्गावर रेणापूर तालुक्यात कोळगाव तांडा इथं कारच्या भीषण अपघातात पिता-पुत्राचा जागीच मृत्यू झाला, तर चार जण जखमी झाले. लातूर इथलं कनाडे कुटुंब देवदर्शन करुन परतत असताना काल पहाटे हा अपघात झाला. जखमींना लातूर इथल्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथं काल दोन तरुणांचा विहिरीत बुडून मृत्यू झाला. सातारा परिसरात काल सायंकाळच्या सुमारास ही दुर्घटना घडली. पोहण्यासाठी विहिरीत उतरलेल्या चार तरुणांपैकी एक जण बुडत असतांना, त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात दुसऱ्याचाही बुडून मृत्यू झाला. सचिन काळे आणि वैभव मोरे अशी या दोघांची नावं आहेत.
****
0 notes
imranjalna · 1 month
Text
जंगे बद्र : इस्लाम की तारीख में पहली जंग, शामिल थे सिर्फ 313 Jang-e-Badr: The first battle in the history of Islam, only 313 people participated
दो हिजरी से ही रमजान के रोजे फर्ज किए गए और रमजान की 17 तारीख को यानि 13 मार्च सन्‌ 624 को इस्लाम की पहली जंग लड़ी गई, जो की जंगे बद्र के नाम से जानी जाती है। ‘ये वो दौर था जब पैगम्बरे इस्लाम हुक्मे इलाही लोगों को बताया करते थे और एक अल्लाह की इबादत करने को कहा करते थे, जिसकी वजह से मक्के के लोग उनकी जान के दुश्मन बन गए थे और आपको आखिरकार हिजरत कर मक्के से मदीने आना पड़ा। इस दौरान आपके साथ आपके…
Tumblr media
View On WordPress
0 notes
abhinews1 · 9 months
Text
शहादत की रात पर उमड़ा जनसैलाब के जगह जगह लंगर का एहतराम किया गया
Tumblr media
शहादत की रात पर उमड़ा जनसैलाब के जगह जगह लंगर का एहतराम किया गया
इस्लामिक नए साल मोहर्रम की 9 तारीख शहादत की रात के मौके पर शुक्रवार को रोशनी से नहाई शहर की सड़कों पर जनसैलाब उमड़ा ताजिये व सवारिया शहर में गश्त के लिए निकली एवं शहर में लगभग जगह जगह लंगर का एतराम किया गया मंडी मदार टेकरी में हुसैने कुरैश कमेटी के द्वारा पूर्व कैबिनेट मंत्री एवं विधायक लखन घनघोरिया और अन्य गणमान्य लोगों का इस्तकबाल किया गया इसी क्रम में केजीएन ग्रुप के चेयरमैन रमजान मार्बल के जानिब से हर साल की तरह इस साल भी लंगर का एहतराम गोहलपुर चौराहे के पास किया गया रमजान मार्बल ने इस मौके पर सभी लोगों का खैर मकदम किया और उनके द्वारा सभी लोगों से दुआओं की दरखास्त किया गया की हर साल लंगर का एतराम ऐसे ही चलता रहे
Tumblr media
Read the full article
0 notes
Text
रमजान ईद : ईद-उल-फित्र म्हणजे काय? ईदची तारीख कशी ठरते?
https://bharatlive.news/?p=89906 रमजान ईद : ईद-उल-फित्र म्हणजे काय? ईदची तारीख कशी ठरते?
भारतातील तसंच ...
0 notes
sharpbharat · 1 year
Text
Jamshedpur masjid samman samaroh : न्यू रानीकुदर इकरा मस्जिद में कुरआन की तिलावत मुकम्मल होने पर सम्मान समारोह आयोजित, मस्जिद में इस वर्ष 7 बच्चों ने कुरआन की तालीम की है मुकम्मल
जमशेदपुर : जमशेदपुर के कदमा न्यू रानीकुदर स्थित इकरा मस्जिद में रमजान-उल-मुबारक की 26वीं तारीख को नमाज ए तरावीह (कुरआन की तिलावत मुकम्मल) होने पर सम्मान समारोह का आयोजन किया गया. इसमें इस वर्ष हाफिज कारी मुस्तफा रजा अजहरी ने तरावीह की नमाज पढ़ाई. (नीचे भी पढ़ें) मो महताब आलम विगत कई वर्षों से इकरा मस्जिद में इमामत कर रहे हैं. उन्हीं की देखरेख में मदरसा अजीजुल इस्लाम में बच्चे तालीम हासिल कर रहे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
365store · 1 year
Text
नौकरी ही जल्द नौकरी होने वाली है 3500 से ज्यादा पोस्ट पर भर्तियां, ग्रेजुएट कर सकते हैं रमजान लागू
नौकरी ही जल्द नौकरी होने वाली है 3500 से ज्यादा पोस्ट पर भर्तियां, ग्रेजुएट कर सकते हैं रमजान लागू
।एमपीपीईबी नौकरियां 2022: एमपी प्रोफेशनल एज़्ज़मिनेशन बोर्ड ने एक भर्ती अधिसूचना जारी की है। जिसके अनुसार राज्य में तीन हजार से ज्यादा पदों पर भर्ती की जाएगी। इस भर्ती अभियान के लिए आवेदन करने वाले भाषा की आधिकारिक साइट http://www.peb.mp.gov.in पर आवेदन कर सकते हैं। भर्ती के लिए आवेदन करने की आखिरी तारीख 19 जनवरी 2022 है। इस अभियान के लिए प्रक्रिया 5 जनवरी से शुरू हो जाएगी। ये है विवरण विवरणइस…
View On WordPress
0 notes
hindimaster · 2 years
Text
Muharram 2022 Ashura Today Know History Importance Of This Day
Muharram 2022 Ashura Today Know History Importance Of This Day
Ashura History and Importance: इस्लामी कैलेंडर के अनुसार, रमजान (Ramadan) दूसरा सबसे पवित्र महीना मुहर्रम (Muharram) का माना जाता है. इस महीने में 10वें दिन आशूरा (Ashura) की तारीख होती है, जिसका इस्लाम (Islam) धर्म में विशेष महत्व है. मुहर्रम का महीना 31 जुलाई से शुरू हुआ था, इसलिए आज आशूरा की तारीख है. इसे यौम-ए-आशूरा भी कहा जाता है. इस्लाम में यह दिन मातम का होता है.  आज से करीब 1400 साल पहले…
View On WordPress
0 notes
medhajsblog · 2 years
Photo
Tumblr media
इस्लाम में सबसे पाक महीना रमजान का माना जाता है, इस महीनों में 30 दिन तक रोजा रखते हैं और अल्लाह से इबादत करते हैं, रमजान का चांद डूबने और ईद का चांद नजर आने पर उसके अगले दिन चांद की पहली तारीख को ईद का त्यौहार मनाया जाता है। जिसे ईद उल-फित्र कहा जाता है, ईद का त्यौहार को सभी आपस में मिल के मनाते है और खुदा से सुख-शांति और बरक्कत के लिए दुआएं मांगते हैं, पूरे विश्व में ईद की खुशी पूरे हर्षोल्लास से मनाई जाती है
visit : https://medhajnews.in/news//Eid-Mubarak-2022-This-Eid-send-these-Beautiful-Message-to-Your-dear-Friends-Family
0 notes
Text
हैप्पी रमज़ान 2022: रमज़ान मुबारक शुभकामनाएँ, चित्र, स्थिति, उद्धरण, संदेश और व्हाट्सएप अभिवादन साझा करने के लिए
हैप्पी रमज़ान 2022: रमज़ान मुबारक शुभकामनाएँ, चित्र, स्थिति, उद्धरण, संदेश और व्हाट्सएप अभिवादन साझा करने के लिए
हैप्पी रमजान 2022: रमजान 2022 शुभकामनाएं उद्धरण, स्थिति, संदेश, तस्वीरें: रमजान इस्लामी धर्म के सबसे प्रमुख त्योहारों में से एक है। रमजान के महीने के दौरान, लोग घंटों तक उपवास रखते हैं और 29-30 दिनों के बाद, वे ईद-उल-फितर नामक दावत के साथ उत्सव समाप्त करते हैं। वे सुबह से शाम तक खाने-पीने से परहेज करते हैं। रमजान इस्लामी कैलेंडर हिजरी का नौवां महीना है और पैगंबर मोहम्मद के साथ आध्यात्मिक रूप से…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years
Text
रमजान २०२२: ३० मिनिटांत स्वादिष्ट इफ्तारसाठी ७ जलद आणि सोप्या पाककृती
रमजान २०२२: ३० मिनिटांत स्वादिष्ट इफ्तारसाठी ७ जलद आणि सोप्या पाककृती
सणांचा हंगाम जवळ आला आहे, आणि आम्ही सुंदर विधी आणि अर्थातच, ओठ-स्माकिंग अन्नाचा आनंद घेण्यासाठी प्रतीक्षा करू शकत नाही. इस्लाम प्रदेशाचा बहुप्रतिक्षित ३० दिवसांचा सण, रमजान 2 एप्रिल 2022 पासून सुरू होईल आणि 2 मे 2022 रोजी संपेल. या महिनाभर चालणार्‍या धार्मिक सणात, जगभरातील मुसलमान दररोज पहाटेपासून संध्याकाळपर्यंत, अन्न आणि पेये वर्ज्य करून उपवास करतात. उपवास (रोजा) सूर्यास्तानंतर विशेष प्रार्थना…
Tumblr media
View On WordPress
0 notes
24gnewshindi · 3 years
Text
रमजान 2021: तारीख, सेहरी और इफ्तार की समय, प्रार्थना समय सारणी, महत्व और उपवास नियम
रमजान 2021: तारीख, सेहरी और इफ्तार की समय, प्रार्थना समय सारणी, महत्व और उपवास नियम
रमजान 2021 की तारीख, सेहरी और इफ्तार समय, प्रार्थना समय सारणी: रमजान इस्लाम में सबसे महत्वपूर्ण अवधियों में से एक है, जिसके दौरान लोग व्रत रखते हैं। इस साल, रमजान 14 अप्रैल, 2021 को शुरू होगा और 12 मई, 2021 की शाम को समाप्त होगा (तारीखें भिन्न हो सकती हैं)। इस समय के दौरान, मुसलमान उपवास का पालन करते हैं, जिसे कहा जाता है रोजा। रखते समय रोजा, सूरज के चमकते समय कुछ भी खाना या पीना नहीं चाहिए। लोग…
View On WordPress
0 notes
col-life23 · 3 years
Text
cbse परीक्षा तिथि: परीक्षा तिथि: म.प्र वेंकटेश निवेदन! - मदुरई के सांसद वेंकटेशन ने रमजान से पहले cbse परीक्षा की तारीख में बदलाव की मांग की है
cbse परीक्षा तिथि: परीक्षा तिथि: म.प्र वेंकटेश निवेदन! – मदुरई के सांसद वेंकटेशन ने रमजान से पहले cbse परीक्षा की तारीख में बदलाव की मांग की है
मदुरै लोकसभा के सदस्य वेंकटेश ने केंद्रीय शिक्षा मंत्री और सीबीएसई निदेशक को पत्र लिखा है। सीबीएसई कक्षा 10 और 12 की सामान्य परीक्षाओं की तारीखों की घोषणा हाल ही में की गई है। तदनुसार, सीबीएसई परीक्षाएं 4 मई, 2021 से 10 जून, 2021 तक आयोजित की जाएंगी। 15 जुलाई को परीक्षा परिणाम आने वाले हैं। केंद्रीय शिक्षा मंत्री रमेश पोखरी ने पहले घोषणा की थी कि कक्षा 12 के लिए नुस्खा परीक्षा 1 मार्च 2021 से…
Tumblr media
View On WordPress
0 notes
imranjalna · 2 months
Text
Ramadan 2024 Date in India: सऊदी में दिखा रमजान का चांद, भारत में 12 मार्च से शुरू होंगे रोजे Ramadan 2024 Date in India: Ramadan moon seen in Saudi, fasting will start in India from March 12
Ramadan 2024 chand sighting: सऊदी अरब में रमजान का चांद दिख गया है. ऐसे में सऊदी अरब में कल यानी 11 मार्च से रमजान की शुरुआत होने वाली है. भारत में 12 मार्च से रोजे रखे जाएंगे. सही तारीख और टाइम जानने के लिए पढ़ें ये लेख. Ramadan chand 2024 in India: आमतौर पर, रमजान का चांद सबसे पहले सऊदी अरब में दिखता है जिसके एक दिन बाद भारत के कुछ हिस्सों के साथ-साथ कुछ पश्चिमी देशों में देखा जाता है. भारत,…
Tumblr media
View On WordPress
0 notes
hindinewshub · 4 years
Text
Eid-Ul-Fitr 2020: 5 Ways to Celebrate the Festival in Isolation
Eid-Ul-Fitr 2020: 5 Ways to Celebrate the Festival in Isolation
[ad_1]
ईद देने का त्योहार है। इस साल दुनिया सबसे बुरे संकट से गुजर रही है जिसका मानव जाति ने कभी भी सामना किया है। ईद-उल-फितर के पवित्र अवसर पर, आप जरूरतमंद लोगों को कुछ दान कर सकते हैं।
Tumblr media
ईद देने का त्योहार है। इस साल दुनिया सबसे बुरे संकट से गुजर रही है जिसका मानव जाति ने कभी भी सामना किया है। ईद-उल-फितर के पवित्र अवसर पर, आप जरूरतमंद लोगों को कुछ दान कर सकते हैं।
कोरोनावायरस…
View On WordPress
0 notes
hindimaster · 2 years
Text
Today Eid Al Adha Festival Celebrating Offer Prayer In Delhi Jama Masjid
Today Eid Al Adha Festival Celebrating Offer Prayer In Delhi Jama Masjid
Bakrid 2022 in India: आज पूरे देश में धूमधाम से बकरीद (Bakrid) का त्योहार मनाया जा रहा है. बकरीद के त्योहार का मुस्लिम धर्म (Muslim Religion) में बहुत महत्व है. इस त्योहार को ईद-उल-अजहा या कुर्बानी का त्योहार भी कहा जाता है. रमजान (Ramadan) के पवित्र महीने के ठीक 70 दिन बाद बकरीद मनाई जाती है. वैसे तो बकरीद की तारीख चांद दिखने से तय होती है, पूरे भारत में आज बकरीद मनाई जाएगी मनाई जा रहा है. ईद उल…
View On WordPress
0 notes
medhajsblog · 2 years
Link
इस्लाम में सबसे पाक महीना रमजान का माना जाता है, इस महीनों में 30 दिन तक रोजा रखते हैं और अल्लाह से इबादत करते हैं, रमजान का चांद डूबने और ईद का चांद नजर आने पर उसके अगले दिन चांद की पहली तारीख को ईद का त्यौहार मनाया जाता है। जिसे ईद उल-फित्र कहा जाता है, ईद का त्यौहार को सभी आपस में मिल के मनाते है और खुदा से सुख-शांति और बरक्कत के लिए दुआएं मांगते हैं, पूरे विश्व में ईद की खुशी पूरे हर्षोल्लास से मनाई जाती है
visit : https://medhajnews.in/news//Eid-Mubarak-2022-This-Eid-send-these-Beautiful-Message-to-Your-dear-Friends-Family
0 notes