Tumgik
#आघाडीसाठी
bharatlivenewsmedia · 2 years
Text
प्रकाश आंबेडकर आघाडीसाठी तयार असल्यास मविआची भूमिका काय?, अजित पवारांनी उघडपणे सांगितलं…
प्रकाश आंबेडकर आघाडीसाठी तयार असल्यास मविआची भूमिका काय?, अजित पवारांनी उघडपणे सांगितलं…
प्रकाश आंबेडकर आघाडीसाठी तयार असल्यास मविआची भूमिका काय?, अजित पवारांनी उघडपणे सांगितलं… मुंबई : वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीचा भाग होऊ शकते, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे.उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीनंतर तर या चर्चांना हवा मिळाली. पण जर वंचित मविआमध्ये सामील होणार असेल तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची भूमिका काय असेल, याबाबत तर्क लावले जात आहेत. राष्ट्रवादीचे नेते आणि…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 1 month
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 06 May 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०६ मे २०२४ सकाळी ७.१० मि.
****
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातल्या प्रचारतोफा शांत-उद्या मतदान
चौथ्या टप्प्यातल्या प्रचारालाही वेग-
छत्तीसगडमधल्या दंतेवाडा जिल्ह्यात ३५ नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण
बीड जिल्ह्यात दोन कोटी रुपयांचं चंदन जप्त-दोन जण ताब्यात
आणि
छत्रपती संभाजीनगर रेल्वेस्थानकात मतदार जागृतीसाठी तीन दिवसीय चित्रप्रदर्शनाचं आयोजन
****
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातल्या प्रचारतोफा काल थंडावल्या. या टप्प्यात मराठवाड्यातल्या लातूर आणि उस्मानाबाद लोकसभा मतदार संघांसह राज्यातल्या सोलापूर, माढा, बारामती, सातारा, सांगली, कोल्हापूर, हातकणंगले, रायगड आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग, या ११ मतदारसंघात उद्या सात मे रोजी मतदान होणार आहे. या सर्व मतदार संघांमध्ये महाविकास आघाडी तसंच महायुतीसह विविध पक्षांच्या उमेदवारांसाठी, विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी काल अखेरच्या दिवशी सायंकाळपर्यंत सभा, मेळावे घेत प्रचार फेऱ्या काढल्या, द्वारसभांच्या माध्यमातून मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी घेण्यावर उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांचा भर दिसून आला.
****
कोल्हापुरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रॅलीमध्ये सहभाग घेतला, तर इंडिया आघाडीसाठी विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी सभा घेतली.
सांगली लोकसभा मतदारसंघात भाजप नेते नितीन गडकरी प्रचारात सहभागी झाले होते. त्यांनी टेंभुर्णे इथंही सभा घेतली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माढा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ फलटण इथं सभेला संबोधित केलं, तर सोलापूर मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ पंढरपूर इथं संकल्प मेळावा घेतला.
बारामती मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्यासाठी अजित पवार यांनी सभा घेतली, तर महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मतदारांना साद घातली.
सांगली लोकसभा मतदारसंघातल्या अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचारार्थ मिरज इथं केसांचा चौकात वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी सभा घेतली.
महाविकास आघाडीचे चंद्रहार पाटील यांच्या प्रचारार्थ आमदार आदित्य ठाकरे यांची सभा झाली, तर सावंतवाडीत भाजपा उमेदवार नारायण राणे यांनी प्रचारसभा घेतली.
लातूर लोकसभा मतदारसंघात अहमदपूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी महायुतीचे उमेदवार सुधाकर शृंगारे यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. तर, काँग्रेस नेते अमित देशमख यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीचे उमेदवार शिवाजी काळगे यांच्या प्रचारार्थ सभा घेण्यात आली.
उस्मानाबाद लोकसभा मतदार संघातही जाहीर प्रचार थांबला असून, आता मतदारांच्या प्रत्यक्ष गाटीभेटींसह, माध्यमांच्या जाहिरातींवर उमेदवारांचा अधिक भर दिसून येत आहे.  
****
चौथ्या टप्प्यातल्या प्रचारानेही आता वेग घेतला आहे.
भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आज राज्यात तीन प्रचारसभा होणार आहेत. दुपारी एक वाजेच्या सुमारास पुणे जिल्ह्यातल्या शिरुर इथं, तीन च्या सुमारास पि��परी-चिंचवड इथं, तर संध्याकाळी साडे चार वाजता रायगड जिल्ह्यातल्या खारघर इथं ते प्रचारसभा घेणार आहे.
जालना लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार कल्याण काळे यांच्या प्राचारार्थ काल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जालना शहरात सभा घेतली.
औरंगाबाद लोकसभा मतदार संघाचे एमआयएमचे उमेदवार सय्यद इम्तियाज जलील यांनी काल वैजापूर इथं पदयात्रा काढली, तर पक्षाचे प्रमुख असदउद्दीन ओवैसी यांची संध्याकाळी छत्रपती संभाजीनगर इथं सभा होणार आहे.
****
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून जे. पी. गावीत यांची उमेदवारी मागे घेतली असून,  महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
****
२६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यासंदर्भात जी भाषा पाकिस्तान करतो, तीच भाषा काँग्रेस का करत आहे, असा थेट सवाल मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी केला आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार विधीज्ञ उज्वल निकम यांच्या संदर्भात केलेल्या विधानाच्या निषेधार्थ ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. यासंदर्भात मुख्य निवडणूक आयोगाकडे तक्रार करत, वड्डेटीवार आणि काँग्रेसवर कारवाईची मागणी केल्याचं शेलार यांनी सांगितलं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला काँग्रेसची ही भूमिका मान्य आहे का, अशी विचारणाही त्यांनी केली. विधीज्ञ निकम ही यावेळी उपस्थित होते, आपल्याकडे बरीच माहिती आहे मात्र देशहित म्हत्वाचा असल्यानं आपन काही बोलत नाही असा इशारा त्यांनी दिला.
****
भारतीय जनता पक्षाने प्रचारासाठी प्रमुख वर्तमानपत्रांत काल प्रसिद्ध केलेली जाहिरात, मतांचं ध्रुवीकरण करणारी असल्याची तक्रार, काँग्रेस पक्षाने केली आहे. प्रदेश काँग्रेसच्या शिष्टमंडळाने काल राज्याच्या अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतली. निवडणूक आयोगाने याप्रकरणी भाजपासह महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करून आचारसंहिता भंगाचे गुन्हे दाखल करावेत अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
****
कामगारांना मतदानाचा हक्क योग्य रीतीनं बजावता यावा, यासाठी सर्व क्षेत्रातल्या कामगारांना मतदानाच्या दिवशी सुट्टी अथवा दोन तासांची सवलत देण्याबाबत राज्य शासनानं परिपत्रक जारी केलं आहे. मतदान करण्यास सवलत मिळाली नाही, अशी तक्रार दाखल झाल्यास संबंधिताविरुद्ध योग्य ती कार्यवाही करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
****
‘लोकनिर्णय महाराष्ट्राचा’ या कार्यक्रमात आजच्या भागात आपण अहमदनगर आणि शिर्डी या मतदार संघांचा आढावा घेणार आहोत. संध्याकाळी सव्वा सात वाजता आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारा हा कार्यक्रम समाज माध्यमांवर ही ऐकता येईल.
****
छत्तीसगडमधल्या दंतेवाडा जिल्ह्यात काल ३५ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं. यापैकी तीन नक्षलवाद्यांवर बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं. दंतेवाडा पोलिसांच्या लोन वरतु मोहिमे अंतर्गत या नक्षलवाद्यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसमोर आत्मसमर्पण केलं. सरकारच्या आत्मसमर्पण आणि पुनर्वसन धोरणांतर्गत प्रोत्साहन म्हणून या सर्वांना प्रत्येकी पंचवीस हजार रुपये दिले जातील.
****
बीड जिल्ह्यात काल दोन कोटी रुपये मूल्याचं चंदन जप्त करण्यात आलं. केज पोलीस ठाण्याच्या हद्दीत काल पहाटे केलेल्या या कारवाईत चंदनाचा सुमारे १२०० किलोचा साठा हस्तगत करण्यात आला. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आलं असून याप्रकरणी केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
पँथर्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष, माजी राज्यमंत्री गंगाधर गाडे यांच्या पार्थिवावर काल छत्रपती संभाजीनगर इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलिसांनी हवेत बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना दिली, गाडे यांचं परवा छत्रपती संभाजीनगर इथं निधन झालं, ते ७६ वर्षांचे होते.
****
छत्रपती संभाजीनगर इथं लोकसभा निवडणूक चौथ्या टप्प्यात १३ मे रोजी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलीस दलानं काल शहरातून संचलन केलं.
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर रेल्वेस्थानकात आजपासून मतदार जनजागृतीसाठी तीन दिवसीय चित्रप्रदर्शनाचं आयोजन करण्यात येत आहे. आज सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते या चित्रप्रदर्शनाचा प्रारंभ होणार आहे. दररोज सकाळी ९ ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत सर्व नागरिकांसाठी हे प्रदर्शन खुलं राहणार आहे.
****
लातूर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक खर्च निरीक्षक संजीब बॅनर्जी यांनी काल रात्री अचानक आंतरराज्य सीमेवरील स्थिर निगराणी पथकांना भेट देवून तिथल्या कामकाजाचा आढावा घेतला. रोकड, मद्य किंवा इतर प्रतिबंधित पदार्थ, वस्तूंची वाहतूक होवू नये, यासाठी स्थिर निगराणी पथकावर वाहनांची तपासणी केली जात आहे.
****
बीड लोकसभा मतदारसंघात पोलीस अधिकारी, कर्मचारी तथा अन्य अधिकारी कर्मचारी जे कर्तव्यावर आहेत, अशा एकूण ६२२ मतदारांनी आतापर्यंत टपाली मतदान केलं आहे.  सहाय्यक निवडणूक अधिकारी शैलेश सूर्यवंशी यांनी ही माहिती दिली. जिल्ह्यात १० ते १२ मे दरम्यान उर्वरित पोस्टल मतदान घेण्यात येणार आहे.
****
नागपूर - मुंबई समृद्धी महामार्गावर बुलडाणा जिल्ह्यात काल एका कार अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला. मेहकर नजीक काल सकाळी हा अपघात झाला, जखमींना छत्रपती संभाजी नगर इथं उपचारासाठी दाखल करण्यात आलं.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण जवळ टेम्पोने दुचाकीला धडक देऊन झालेल्या अपघातात एका महिलेसह तिच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला. हा २१ वर्षीय युवक काल संध्याकाळी दुचाकीवर त्याच्या आईसह शेवगाव इथं जात असताना हा अपघात झाला.
****
अभिनेते, लेखक आणि दिग्दर्शक क्षितीज झारापकर यांचं काल मुंबईत निधन झालं. ते ५४ वर्षांचे होते. क्षितीज झारापकर यांनी गोळाबेरीज, ठेंगा, एकुलती एक, आयडियाची कल्पना आदी चित्रपटांतून विविध भूमिका साकारल्या.
****
इंडियन प्रिमियर लीग - आयपीएल टी-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत काल झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जनं पंजाब किंग्जला २८ धावांनी हरवलं. तर अन्य एका सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने लखनौ सुपर जायन्ट्सचा ९८ धावांनी पराभव केला. आज या स्पर्धेत मुंबईत मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद संघादरम्यान सामना होणार आहे.
****
राज्यात काल सोलापुरात सर्वाधिक  ४४ पूर्णांक ४ दशांश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली
मराठवाड्यात परभणी इथं ४३ पूर्णांक सात, नांदेड ४२ पूर्णांक ८, बीड ४२, तर छत्रपती संभाजीनगरचं तापमान ४१ पूर्णांक सहा एवढं नोंदवलं गेलं.
दरम्यान, नांदेड आणि लातूर जिल्ह्यात दोन दिवस तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडासह पावसाची शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केली आहे.
****
0 notes
journalist27 · 2 years
Text
Tumblr media
दिपक मोहिते,
" हल्लाबोल,"
महाविकास आघाडी सरकारची वाटचाल खडतर,
अखेर,भाजपने बाजी मारली,विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये पाचवी जागा जिंकून त्यांनी महाविकास आघाडीच्या तोंडाला फेस आणला आहे.येणारा काळ,हा महाविकास आघाडी सरकारला अत्यंत खडतर असून कदाचित सरकारला धोकाही निर्माण होऊ शकतो.
दोन आठवड्याड्यापूर्वी झालेल्या राज्यसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्ष सावध झाले व त्यांनी या निवडणुकीत भाजपला कोणत्याही परिस्थितीत रोखायचेच,असा चंग बांधला होता.दगाफटका होऊ नये,यासाठी विशेष खबरदारी घेतली होती.११३ मते हाती असताना भाजपने मात्र आपले पाच उमेदवार रिंगणात उतरवुन हे आवाहन स्विकारले होते.त्यांना पाचही उमेदवार निवडून येण्यासाठी त्यांना १३५ मतांची गरज होती.अतिरिक्त २२ मते त्यांना मिळवणे,शक्य होणार नाही,अशी चर्चा होत होती.पण काल त्यांनी १३४ मते मिळवत आपले पाचही उमेदवार निवडून आणले. त्यांच्या या पराक्रमाने महाविकास आघाडी सरकारची अक्षरशः बोबडीच वळली आहे.सेनेची ३ व सहयोगी ८ अपक्ष,अशी एकूण अकरा मते फुटल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा संताप अनावर झाला असून त्यांनी आपल्या आमदारांची तातडीने बैठक बोलावली आहे.काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची मतेही फुटली असून काँग्रेसच्या चंद्रकांत हंडोरे यांना पराभूत व्हावे लागले आहे,तर भाई जगताप हे पराभूत होता होता थोडक्यात बचावले.
या सर्व घडामोडीनंतर राज्यात लवकरच राजकीय उलथापालथी होण्याची शक्यता आहे.या विजयामुळे भाजपचा विश्वास दुणावला असून महाविकास आघाडीमधील असंतुष्ट आमदारांना आपलेसे करून भाजप,महाविकास आघाडी सरकारवर अविश्वास प्रस्ताव आणेल,अशी शक्यता वाटते.महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील अनेक आमदार,हे निधी वाटपातील दुजाभाव,आपल्या मतदारसंघातील विकासकामे वेळोवेळी मंजूर न होणे,महामंडळाच्या पदावर नियुक्ती करण्याबाबत डावलणे,अशा विविध कारणांमुळे नाराज आहेत.अशा आमदारांच्या बळावर भाजप पुढील रणनिती आखण्याच्या तयारीत आहे.त्यामुळे महाविकास आघाडीसाठी येणारा काळ अत्यंत कठीण आहे.
0 notes
loksutra · 2 years
Text
राज्यसभेचा खेळ संपला, आता विधानपरिषद निवडणुकीची पाळी; महाराष्ट्रात आघाडी तणावात आहे
राज्यसभेचा खेळ संपला, आता विधानपरिषद निवडणुकीची पाळी; महाराष्ट्रात आघाडी तणावात आहे
देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे (फाइल फोटो). महाविकास आघाडीसाठी तणावाचे सर्वात मोठे कारण म्हणजे राज्यसभेप्रमाणेच विधान परिषदेच्या निवडणुकीतही गुप्त मतदान होणार आहे. राज्यसभेचा खेळ आता संपला आहे. त्याचा परिणाम (राज्यसभा निवडणुकीचा निकाल) आले आहेत. महाराष्ट्रातील 6 जागांपैकी भाजपने तीन तर महाविकास आघाडीने तीन जागा जिंकल्या आहेत. आकड्यांचा खेळ पाहता भाजपच्या दोन उमेदवारांचा विजय जवळपास निश्चित…
Tumblr media
View On WordPress
0 notes
kokannow · 2 years
Text
कुडाळ पंचक्रोशी सोसायटीच्या निवडणुकीत भाजपचा धुव्वा !
कुडाळ पंचक्रोशी सोसायटीच्या निवडणुकीत भाजपचा धुव्वा !
​​रोहन नाईक । कुडाळ : जिल्ह्यात अतिशय प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या कुडाळ पंचक्रोशी विविध कार्यकारी सेवा सोसायटी कुडाळच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने एकतर्फी विजय मिळवीत सर्वच्या सर्व १३ जागा काबीज केल्या आहेत. मात्र, कुडाळमध्ये महाविकास आघाडीचे कट्टर विरोधी असलेल्या भाजपला येथे एकही जागा जिंकता आली नाही. ही निवडणूक भाजप आणि महाविकास आघाडीसाठी महत्वाची होती. मुख्य म्हणजे काही महिन्यांपूर्वी पार…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rajendrasomani · 2 years
Text
मायावती यांच्यावर राहुल गांधींनी साधला निशाणा..
मायावती यांच्यावर राहुल गांधींनी साधला निशाणा..
उत्तर प्रदेश येथील निवडणुकात मायावती यांचा बसपा पक्ष अगदीच शांत असल्याचे दिसून आले होते त्याविषयी केवळ ईडी आणि सीबीआय यांच्या कारवाईमुळे मायावती यांनी काँग्रेसने आघाडीसाठी दिलेल्या प्रस्तावावर कोणताही प्रतिसाद दिला नाही असा घणाघाती आरोप काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शनिवारी केलेला आहे. राहुल गांधी म्हणाले की, उत्तर प्रदेश निवडणुकीच्या वेळी काँग्रेस कडून मायावती यांना आघाडीसाठी प्रस्ताव…
Tumblr media
View On WordPress
0 notes
shaharvarta11 · 2 years
Text
मायावती यांच्यावर राहुल गांधींनी साधला निशाणा..
मायावती यांच्यावर राहुल गांधींनी साधला निशाणा..
उत्तर प्रदेश येथील निवडणुकात मायावती यांचा बसपा पक्ष अगदीच शांत असल्याचे दिसून आले होते त्याविषयी केवळ ईडी आणि सीबीआय यांच्या कारवाईमुळे मायावती यांनी काँग्रेसने आघाडीसाठी दिलेल्या प्रस्तावावर कोणताही प्रतिसाद दिला नाही असा घणाघाती आरोप काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शनिवारी केलेला आहे. राहुल गांधी म्हणाले की, उत्तर प्रदेश निवडणुकीच्या वेळी काँग्रेस कडून मायावती यांना आघाडीसाठी प्रस्ताव…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
उद्धव ठाकरेंची फोन न उचलण्याची निंजा टेक्निक, ज्यानंच सरकार आलं आणि संकटात पण सापडलं
उद्धव ठाकरेंची फोन न उचलण्याची निंजा टेक्निक, ज्यानंच सरकार आलं आणि संकटात पण सापडलं
उद्धव ठाकरेंची फोन न उचलण्याची निंजा टेक्निक, ज्यानंच सरकार आलं आणि संकटात पण सापडलं शिवसेना आमदारांच्या बंडांचं काय होणार ? याचं उत्तर आता विधानसभेत होणाऱ्या बहुमत चाचणीमधून मिळमन्याची शक्यता आहे. शिंदे गटाकडे असलेलं संख्याबळ, त्यांना भाजपचा मिळणारा साहजिक पाठिंबा पाहता महाविकास आघाडीसाठी ही अग्नीपरीक्षा असणार आहे, हे नक्की. सरकार वाचवण्यासाठी महाविकास आघाडी सगळे पर्याय चाचपडून पाहणार यात मात्र…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 1 month
Text
 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
संक्षिप्त बातमीपत्र
३० एप्रिल २०२४ सकाळी ११.०० वाजता
****
मणिपूर मध्ये आऊटर मणिपूर मतदारसंघातल्या सहा मतदान केंद्रांवर आज फेर मतदान होत आहे. या केंद्रांवर लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात २६ एप्रिलला मतदान झालं होतं, मात्र निवडणूक आयोगानं याठिकाणी पुन्हा मतदान घेण्याचे निर्देश दिले होते. 
****
भाजपचे ज्येष्ठ नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी आज माळशिरस, उस्मानाबाद आणि लातूर इथं प्रचारसभा होणार आहेत. लातूर इथं सारोळा रस्त्यावर ४० एकर मैदानावर ही सभा होणार असून, उन्हापासून बचावासाठी अडीच लाख चौरस फूट मंडपाची उभारणी करण्यात आली आहे. धाराशिव इथं तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयालगत असलेल्या २५ एकर क्षेत्रावर मोदींची सभा होणार आहे.
****
वंचित बहुजन आघाडीसाठी यंदा सकारात्मक वातावरण असून, यावेळी आम्ही आमचं लोकसभेतलं खातं नक्की उघडू, असा विश्वास, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी काल पुण्यात व्यक्त केला. वंचितचे पुण्यातले उमेदवार वसंत मोरे यांच्या प्रचार शबेत ते काल बोलत होते.
****
बुलढाणा जिल्ह्यात पावसाळ्यामध्ये पडलेला अल्प पाऊस तसंच सद्य:स्थितीत भीषण उन्हामुळे जलसाठे कोरडे होताना दिसत आहे. सध्या जिल्ह्यातल्या धरणांमध्ये १७ पूर्णांक ८३ टक्के जलसाठा असून, येणाऱ्या दिवसांमध्ये जिल्ह्यात भीषण पाणी टंचाईची शक्यता निर्माण झाली आहे. जिल्ह्यातला सर्वात मोठा प्रकल्प असलेल्या खडकपूर्णा धरणातून पाणीपुरवठा योजनांसाठी जलसाठा राखीव ठेवण्यात आला आहे.
****
मालदीव इथं झालेल्या सहाव्या आशियाई कॅरम अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या पुरुष आणि महिला संघांनी दुहेरीत विजेतेपद पटकावलं आहे. पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत भारताच्या मोहम्मद गुफरान आणि श्रीनीवास यांच्या जोडीनं मालदीवच्या जोडीचा २५-१५, २५-१६ असा पराभव केला. तर महिला दुहेरीत आकांक्षा कदम आणि शायनी सेबेस्टियन यांनी भारताच्याच रश्मी कुमारी आणि नागा जोथी या जोडीचा २१-२५, २५-१७, २५-१७ असा पराभव केला.
****
दुबईत नुकत्याच झालेल्या २० वर्षांखालील आशियाई अजिंक्यपद मैदानी स्पर्धेत तीन हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत पुण्याच्या गौरव भोसले यानं रौप्य पदक पटकावलं. या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी सहा सुवर्ण पदकांसह एकूण १८ पदकं मिळवली.
****
0 notes
Text
अर्विभावात - प्रकाश आंबेडकर
प्रकाश आंबेडकरांच्या बहूचर्चीत बहुजन वंचित आघाडीने आता नव्या इंनिंगला सुरूवात केली आहे. बड्या पक्षाचे नेतृत्त्व नाकारून प्रकाश आंबेडकरांनी एकला चलो रे अशी भुमीका घेतलेली आहे. यापूर्वीही काँग्रेस पक्षाने छोट्या पक्षाचा राजकीय वापर करून दलित, अल्पसंख्यांक मतांच्या बळावर सत्ता उपभोगली असली तरी अशा दुर्बल घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काँग्रेसने कायम हात आखूड ठेवलेले आहेत. प्रकाश आंबेडकरांच्या बाबतीत सुद्धा वेगळे काही घडले नाही. म्हणून यावेळी आघाडीसाठी काँग्रेसच्या उत्तराची वाट न पाहता प्रकाश आंबेडकर सोलापूरहून जागा लढवणार. मात्र, सोलापूरात २०१९ ला ही पुन्हा कमळच फुलणार. तेथून भारिप बहुजन महासंघाचे प्रकाश आंबेडकर निवडून येणे कदापी शक्‍य नाही, अशी भविष्यवाणी भाजप कडून होतेय.
खरं तर प्रकाश आंबेडकरांना काँग्रेसने गांभीर्याने न घेतल्याने कुठे तरी आंबेडकरांचा इगो हर्ट झाला आहे, हे आता स्पष्ट झाले आहे. मात्र, सोलापूरात काँग्रेसचे वर्चस्व नसल्याने या उमेदवारीचा थेट परिणाम भाजपला होईल, अशा अर्विभावात प्रकाश आंबेडकर आहेत. तरी थेट भाजपचा पराभव करण्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी एक गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे की, या मतदारसंघात आता भाजपची व्होटबॅंक तयार झालेली आहे. तरी अकोला पॅटर्न पुन्हा एकदा अमलात आणू इच्छिणाऱ्या प्रकाश आंबेडकरंनी भाजपला आव्हान दिले असले तरी सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा सोलापूरात बेस पाहता आंबेडकरांना तेथे जनाधार नाही. त्यामुळे आंबेडकर यांच्या उमेदवारीचा तेथील भाजपच्या उमेदवारावर कसलाही विपरित परिणाम होणार नाही.
Tumblr media
0 notes
kokannow · 5 years
Photo
Tumblr media
खासदार विनायक राऊत यांचे कुडाळमध्ये अभिनंदन; महाविकास आघाडीसाठी मोलाचे प्रयत्न कुडाळ ​: महाराष्ट्राच्या राजकारणात महाविकास आघाडीला एकत्र आणण्या​त  व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्यात योगदान असणाऱ्या शिवसेना सचिव तथा लोकसभा गटनेते खासदार विनायक राऊत यांचे ​रविवारी  सायंकाळी कुडाळ शिवसेनेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले​.​
0 notes
inshortsmarathi · 5 years
Text
लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याची बसपा अध्यक्षा मायावती यांची घोषणा
लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याची बसपा अध्यक्षा मायावती यांची घोषणा
बहुजन समाजवादी पार्टीच्या अध्यक्षा मायावती यांनी 2019 ची लोकसभा निवडणुक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. मायावती यांनी स्पष्ट केलं की, ‘सध्या मी लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. पुढे मला वाटलं तर कोणतीही जागा रिक्त करत निवडणूक लढवून मी लोकसभा खासदार होऊ शकते.
उत्तरप्रदेशमध्ये काँग्रेसने सपा आणि बसपा यांच्या आघाडीसाठी काँग्रेसने 7 जागा सोडण्याचा निर्णय घेतला होता. यावर ट्विट करत…
View On WordPress
0 notes
theinvisibleindian · 5 years
Text
निवडणुकांनंतर काँग्रेसच्या बॅगा उचलणारे व्हायचे नाही – प्रकाश आंबेडकर
निवडणुकांनंतर काँग्रेसच्या बॅगा उचलणारे व्हायचे नाही – प्रकाश आंबेडकर #hellomaharashtra
अकोला प्रतिनिधी | राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला संविधानाच्या कक्षात आणण्यासाठी काँग्रेसला दिलेल्या प्रस्तावानुसार आराखडा सादर होत नाही, तोपर्यंत वंचित बहुजन आघाडीतर्फे लोकसभेच्या आघाडीसाठी तडजोड करणार नाही, असा इशार बहुजन वंचित आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसला दिला. आज शहरातील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
आघाडीतील कळीचा मुद्दा आरएसएस हा असून तो मान्य करुन…
View On WordPress
0 notes
vijaynilangekarme · 6 years
Video
youtube
अड़. आम्बेडकरानी कॉंग्रेसच्या वरिष्ठांशी आघाडीसाठी चर्चा जरूर करावी - खा....
0 notes
webmaharashtra-blog · 7 years
Text
"राष्ट्रवादीसोबत आघाडी होऊ शकते"
“राष्ट्रवादीसोबत आघाडी होऊ शकते”
ठाणे / प्रतिनिधी :  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेससोबत आघाडीसाठी अनुकूलता दाखवली असतानाच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनीही राष्ट्रवादीसोबत आघाडी होऊ शकते, असे सुतोवाच केले. ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने शनिवारी टिप-टॉप प्लाझा येथे आयोजित केलेल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीसाठी नारायण राणे…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 1 year
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 22 January 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २२ जानेवारी २०२३ सायंकाळी ६.१०
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 22 January 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
डिजिटल आर्थिक देवाण घेवाणीमुळं अनेकांचं जीवन सुलभ आणि आरामदायी- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन
जुन्या सेवानिवृत्ती वेतन योजनेचा अभ्यास सुरू- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती 
आघाडीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचं स्वागत - प्रकाश आंबेडकर यांची भूमिका
आणि
हॅलो मेडीकल फाऊंडेशनला उत्कृष्ट स्वयंसेवी संस्थेसाठीचा पुरस्कार जाहीर
****
डिजिटल आर्थिक देवाण घेवाणीमुळं अनेकांचं जीवन सुलभ आणि आरामदायी झालं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. त्यांनी आज एका नागरिकाला सामाजिक संपर्क माध्यमाद्वारे उत्तर देताना ही माहिती दिली. याविषयीची अनेक उदाहरणं आपल्याला आढळतील, असं ते म्हणाले. देशातल्या डिजिटल आर्थिक देवाण घेवाण अंगिकाराबाबत अन्य एका प्रवासी भारतीयाला उत्तर देताना देताना ते म्हणाले की, देशामध्ये आता हे नेहमीचं दृश्य बनलं आहे. आपल्या जनतेनं तंत्रज्ञान आणि नवोन्मेष यांचा अंगिकार करण्यामध्ये उल्लेखनीय कुशलता दाखवली आहे.
****
शिक्षकांना जुन्या सेवानिवृत्ती योजनेबाबत शिक्षण विभागाक़डून अभ्यास सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. त्यांच्या उपस्थितीमध्ये आज ठाण्यामध्ये विधान परिषदेच्या कोकण शिक्षक मतदारसंघातल्या भारतीय जनता पक्ष - बाळासाहेबांची शिवसेना युतीच्या उमेदवारासाठी सभा झाली, त्यावेळी शिंदे बोलत होते. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसह शिक्षकांना जुनी सेवा निवृत्ती योजना, विनाअनुदानित शाळा, इंग्रजी माध्यमात २५ टक्के आरक्षण आदींसह विविध प्रश्नांबाबत राज्य सरकार सकारात्मक आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली. शिक्षक मतदारसंघाचा आमदार हा शिक्षकच असावा, अशी भूमिका त्यांनी मांडली. दावोस इथल्या परिषदेतल्या गुंतवणुकीसंदर्भात आरोप केले जात आहेत. मात्र, अनेक परदेशी कंपन्या थेट गुंतवणूक करण्याऐवजी एकत्रित उपक्रमातून गुंतवणुकीला प्राधान्य देतात, असं ते म्हणाले. दावोसमध्ये अनेक उद्योगपती देशातले असले, तरी गुंतवणूक ही परदेशीच आहे, असं मुख्यमंत्र्यांनी नमुद केलं. यापूर्वीच्या सरकारनं केलेल्या सामंजस्य कराराचं काय झालं,  असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. कितीही आरोप केले तरी कामानं उत्तर देणारं हे युतीचं सरकार असून आरोपांचा आपण नक्कीच हिशोब देऊ, असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
****
वंचित बहुजन आघाडी ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबत आघाडीकरताना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं स्वागतच करेल, अशी माहिती या पक्षाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे. ते आज अमरावतीमध्ये पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले...
त्यांना असं वाटतय की, आपण राष्ट्रवादीला ही बरोबर घेतलं पाहिजे. आणि काँग्रेसलाही बरोबर घेतलं पाहिजे. तो त्यांच्यामधला असणारा इश्यू आहे. आम्ही त्यांना असं म्हटलय की, तुम्ही काँग्रेसलाही घेऊन या त्यांचंही आम्ही स्वागत करु. राष्ट्रवादीलाही घेऊन या त्यांचंही आम्ही स्वागत करु. ज्या दिवशी त्यांचा निकाल होईल, बोलणीच्या संदर्भातला सेनेमधला निकाल होईल की आता आपण ही तरी घोषणा करु आणि मग पुढे जाऊ, त्या दिवशी ती घोषणा होईल असं मी त्या ठिकाणी ग्राह्य धरतो.
****
केंद्र सरकारचा प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभाग आणि महाराष्ट्र सरकारच्या दोन दिवसीय `ई-गव्हर्नन्स` परिषदेला उद्या मुंबईत प्रारंभ होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते याचं उद्घाटन होईल. देशभरातून २० राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशातले पाचशेहून अधिक प्रतिनिधी यामध्ये प्रत्यक्ष आणि आभासी पद्धतीनं उपस्थित राहणार आहेत. या परिषदेत संस्थांचं डिजिटल परिवर्तन आणि नागरिकांचं डिजिटल सक्षमीकरण यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी या क्षेत्रातल्या तज्ज्ञ मान्यवरांच्या उपस्थितीत चर्चा होणार आहे. केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंग आणि उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मंगळवारी या परिषदेत मार्गदर्शन करणार आहेत.
****
प्रजासत्ताक दिनानिमित्त, दिल्ली इथं घेण्यात आलेल्या आंतरराज्य सांस्कृतिक कार्यक्रमांच्या स्पर्धेत महाराष्ट्राला द्वितीय पारितोषिक मिळालं आहे. या कामगिरीबद्दल राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विजयी संघ आणि सांस्कृतिक कार्य विभागाचं अभिनंदन केलं आहे. एकूण पंधरा संघ सहभागी असलेल्या या स्पर्धेत, महाराष्ट्रानं धनगरी नृत्य या लोककला प्रकारात अप्रतिम सादरीकरण करून द्वितीय क्रमांक पटकावला. या सादरीकरणात एकूण २४ कलाकारांनी भाग घेतला. प्रथम क्रमांक उत्तर प्रदेश या राज्यास मिळाला तर तृतीय क्रमांक झारखंड या राज्याला मिळाला आहे.
****
गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षणासाठी परस्पर संवाद महत्वाचा असल्याचं राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी म्हटलं आहे. त्यांनी आज पुण्यात 'भारतात उच्च शिक्षणातली धोरण निश्चिती आणि परिवर्तन' या विषयावर आयोजित कार्यशाळेचं उदघाटन केलं, त्यावेळी कोश्यारी बोलत होते.  उच्च शिक्षण क्षेत्रातले तज्ज्ञ एकत्र आल्यानं नव्या आवाहनांना समर्थपणे सामोरी जाणारी आणि सक्षम शैक्षणिक व्यवस्था निर्माण करता येईल, असं ते म्हणाले. नव्या शैक्षणिक धोरणानुसार भारतात परदेशी विद्यापीठांना संधी आहे, त्याचा उपयोग देशातल्या विद्यापीठांना होईल. आपल्या देशाकडेही जगाला देण्यासाठी भारतीय मूल्य विचारांसह विविध प्रकारचं ज्ञान आहे, असं त्यांनी सांगितलं. खाजगी विद्यापीठांनी समर्पित भावनेनं शिक्षण क्षेत्राच्या प्रगतीसाठी पुढं यावं, असं आवाहन कोश्यारी यांनी यावेळी केलं.
****
ठाण्याच्या गुरूकुल प्रतिष्ठानच्या वतीनं देण्यात येणारा पंडित हरिप्रसाद चौरसिया जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ शास्त्रीय संगीत गायिका डॉ प्रभा अत्रे यांना आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. मानपत्र, शाल आणि एक लाख रुपयांचा धनादेश असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. देशाच्या सीमा ओलांडून भारतीय शास्त्रीय संगीत पोहचवण्याचं काम प्रभा अत्रे यांनी केलं असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. राज्यातलं सरकार सर्व घटकांचं असून आपलं सरकार कला प्रेमी आहे असंही त्यांनी नमुद केलं. यावेळी प्रतिष्ठानच्या वतीनं `बांसुरी उत्सव` साजरा करण्यात आला.
****
राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आले ��हेत. यात उस्मानाबाद जिल्ह्यातल्या अणदूर इथल्या हॅलो मेडीकल फाऊंडेशनला उत्कृष्ट स्वयंसेवी संस्थेसाठीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्कार विजेत्यांमध्ये उत्कृष्ठ काम करणारे डॉक्टर म्हणुन डॉ. प्रमोद पोतदार वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, अमरावती. डॉ. उमेश कदम, वैद्यकीय अधीक्षक, सेवा रुग्णालय, कोल्हापूर आणि  डॉ. सदानंद राऊत, पुणे यांचा समावेश आहे.तर आरोग्य क्षेत्रात उत्कृष्ट काम करणारे पत्रकार म्हणुन दैनिक लोकसत्ताचे ठाणे इथले सहयोगी संपादक संदीप आचार्य यांना तसंच उत्कृष्ट कर्मचारी म्हणून हिंगोलीचे प्रशांत संभाप्पा तुपकरी यांना गौरवण्यात आलं आहे. उद्या संध्याकाळी चार वाजता वांद्रे इथल्या रंगशारदा सभागृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार वितरण केलं जाणार आहे.
****
मराठवाड्याच्या विकासाची पुनर्रचना करावी लागणार असुन कलम ३७१ अन्वये आसाम आणि त्रिपुरा या ईशान्य राज्यांना केंद्र सरकारनं जशी विशेष आर्थिक मदत केली त्याच धर्तीवर मराठवाडा आणि विदर्भाला सहा लाख कोटी रुपयांची आर्थिक मदत करावी अशी मागणी ज्येष्ठ विचारवंत  डॉ. सतीश रत्नपारखी यांनी केली आहे. त्यांचं आज औरंगाबादमध्ये हैदराबाद मुक्ती संग्राम लढ्याचे अग्रणी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या स्मृती दिनानिमित्त `मराठवाडा विकास` या विषयावर व्याख्यान झालं, त्यावेळी रत्नपारखी बोलत होते. मराठवाड्यासाठी असणारं वैधानिक विकास मंडळ कमकुवत असून त्याला सक्षम करणं गरजेचं असल्याचंही ते यावेळी म्हणाले. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्थेनं हा अभिवादनपर कार्यक्रम घेतला.
****
थायलंडच्या कुनलावूत वितिदसर्न आणि कोरियाच्या ॲन सेयोउंग यांनी भारतीय खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतलं अनुक्रमे पुरुष आणि महिला एकेरीचं आज विजेतेपद पटकावलं. कुनलावूतनं नवी दिल्लीमध्ये जगातला क्रमांक एकचा खेळाडू डेन्मार्कच्या व्हिक्टर अक्सेल्सनविरुद्ध २२-२०, १०-२१ आणि २१-१२ असा ६४ मिनिटांमध्ये विजय नोंदवला. महिलांच्या एकेरीचं विजेतेपद पटकवताना कोरियाच्या आन सियोंगनं अंतिम लढतीमध्ये जपानच्या ए. यामागुशीवर १५-२१, २१-१६, २१-१२ असा विजय मिळवला. पुरुष दुहेरीमध्ये जागतिक अकरावी क्रमवारी प्राप्त लिआंग वेई केंग आणि वँग चँग यांची जोडी विजेती ठरली.  
****
संयुक्त किसान मोर्चातर्फे येत्या बुधवारी राज्यभर निदर्शनं आणि सत्याग्रहाचा इशारा देण्यात आला आहे. दिल्ली इथं झालेल्या सत्याग्रहातल्या मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन केंद्र शासनानं पूर्ण न केल्यानं हे आंदोलन करण्यात येणार असल्याचं किसान सभेचे सरचिटणीस राजन क्षीरसागर यांनी सांगितलं. या आंदोलनात ३८ संघटना सहभागी होणार आहेत. शेती उत्पादनाच्या वस्तू आणि सेवांवरचा कर रद्द करावा, शेतकऱ्यांना सेवानिवृत्ती योजना द्यावी या मागण्यांसह एक निवेदन राष्ट्रपतींना देण्यात येणार असल्याचं क्षिरसागर यावेळी म्हणाले.
****
0 notes