Tumgik
nyahaari · 2 years
Photo
Tumblr media
#Cheesemaggie #Instantmaggie #2minute noodles https://www.instagram.com/p/Cc0quAhvTtu/?igshid=NGJjMDIxMWI=
0 notes
nyahaari · 3 years
Photo
Tumblr media
Vanilla sponge cake 🎂
0 notes
nyahaari · 3 years
Text
रुचकर पोहे
Tumblr media Tumblr media
साहित्य : -
जाड पोहे १ मोठी वाटी
कांदा १
मिरच्या ३ ते ४
बटाटे १
कोथिंबीर
कृती : -
जाड पोहे पाणी टाकून भिजवणे. कांदा बारीक चिरून घ्यावा. मिरच्या आपल्या आवडीनुसार कमी किंवा जास्त घेणे. बटाटा उकडून घेणे किंवा कच्चा बटाटा बारीक चिरून घ्यावा.
प्रथम कढईत तेल टाकून ते गरम झाल्यावर मोहरी , जिरे, कढीपत्ता घालावा. बटाटे कच्चे काप करून घालावे. थोडे शिजल्या सारखे झाल्यावर त्यात शेंगदाणा परतावे. बारीक चिरलेला कांदा व मिरची घालावी. थोडा लालसर कांदा झाला की त्यात १ चमचा साखर घालावी. लिंबू पिळून घ्यावा. मग हळद घालून पोहे टाकावे. मीठ टाकावे. नंतर कोथमबीर घालावी. ५ मिनिट वाफवावे.
अश्या रितीने आपले खमंग व गरमागरम पोहे तयार किंवा पोहे तयार झाले की वरून कांदा घेतला तरी पण छान लागतो.वरून शेव टाकून गरमागरम सर्व्ह करावे.
0 notes
nyahaari · 3 years
Text
एक नवी सुरवात...
स्वयंपाक घरात काम करणे हे मला आवडत नव्हते पण, घरी कोणी नसले की काहीतरी खायला बनवावे लागते. तशीच हळुहळू नवनवीन पदार्थ बनवण्याची सवय लागली. मग पदार्थ छान झाला की त्याची कृती लिहून ठेवत असे. रोज लिहिता लिहिता ठरवलं की आता ब्लॉग लिहावा. आपला अनुभव शेअर करावा.
आजकाल इन्स्टंट पदार्थांचा वापर जास्त होऊ लागला आहे पण, तरीही पारंपरिक पद्धतीचे पदार्थ आजही लोकप्रिय आहेत. दर ८ ते १० मैलाच्या अंतराने भाषा बदलते, त्याप्रमाणे जेवणात ही बदल होत जातो. आपणही काही पदार्थ बघुयात जे मी केलेले आहेत, ते तुम्हीही करून बघा. कसे वाटले ते सांगा.
1 note · View note