Tumgik
kvksagroli · 12 hours
Text
Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media
भाजीपाल्याचे निर्जलीकरण - एक फायदेशीर उद्योग या विषयावर एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम. भाजीपाल्याचे निर्जलीकरण करून त्याचा साठवणुकीचा काळ वाढवता येतो. तसेच निर्जलीकरण केल्यामुळे भाजीपाल्याची नासाडी देखील थांबते व महिलांसाठी हा एक चांगला व्यवसाय होऊ शकतो. म्हणुनच भाजीपाल्याचे निर्जलीकरण - एक फायदेशीर उद्योग या विषयावर एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम. कृषी विज्ञान केंद्र सगरोळी येथे आयोजित करण्यात आला. या प्रशिक्षणासाठी बेळकोणी, ता. बीलोली येथील उत्सुक महिलांनी सहभाग नोंदवला. सदरील प्रशिक्षण संस्थेच्या BCRC प्रकल्प व अमृतालयम शेतकरी उत्पादक कंपनी यांच्या संयुक्त सहभागाने घेण्यात आले. #womenownedbusiness #womensupportingwomen #women #womenshealth #vegetables #भाजीपाल्याचे #निर्जलीकरण #KrishiVigyanKendra
0 notes
kvksagroli · 14 hours
Text
Tumblr media Tumblr media
पेरणीपूर्व बीजप्रक्रिया अत्यंत महत्वाची - डॉ. कृष्णा अंभुरे शेतकऱ्यांना खरीप हंगाम पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमात मार्गदर्शन केले यामध्ये त्यांनी शेतकऱ्यांना खरीप पिकांसाठी पेरणीपूर्व जमीन मशागत, बियाण्यांची निवड, बीज प्रक्रिया, बीज प्रक्रियेसाठी लागणाऱ्या विविध निविष्ठा, बियाणे उगवण क्षमता तपासणी तसेच हुमणी अळी व शंखी गोगलगाय व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला उपस्थित असलेले मंडळ कृषी अधिकारी एन.एस. कुर��ंद यांनी शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली. प्रशिक्षण कार्यक्रमाला कृषी सहाय्यक सावळे उपस्थित होते. मार्गदर्शनानंतर डॉ. कृष्णा अंभुरे यांनी शेतकऱ्यांना बीज प्रक्रियेचे प्रात्यक्षिक करून दाखवले. प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री. मारोती वड्डे यांनी परिश्रम घेतले. #agriculture #KrishiVigyanKendra #पेरणीपूर्व #बीजप्रक्रिया #खरीप #शेतकरी #प्रशिक्षण #हंगाम #बियाणे
0 notes
kvksagroli · 1 day
Text
Tumblr media
बचत गट तयार झाल्यानंतर त्याचे योग्य व्यवस्थापन करणे गरजेच आहे. महिला बचत गट स्थापन करतात परंतु त्यांचा त्यामागील मुख्य उद्देश पैशाची देवाण-घेवाण हाच असतो. म्हणूनच स्थापन झालेल्या बचत गटांना पु��ील वाटचालीसाठी व योग्य व्यवस्थापनासाठी मार्गदर्शन गरजेचे असते. म्हणूनच हरनाळी तालुका बिलोली या गावांमध्ये बचत गटांचे स्थापना व व्यवस्थापन या विषयावर कृषी विज्ञान केंद्र व संस्थेच्या बीसीआरसी प्रकल्पाच्या संयुक्त विद्यमाने प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये उमेद अभियाना अंतर्गत स्थापित बचत गटांच्या महिलांनी सहभाग नोंदवला. #agriculture #KrishiVigyanKendra #womensupportingwomen #women #womeninbusiness
0 notes
kvksagroli · 1 day
Text
Tumblr media
जागतिक मधमाशी दिनानिमित्त शेतकऱ्यांना मार्गदर्शन. मधमाशांचे शेतीमधील महत्त्व आणि त्यांचे संवर्धन करण्याच्या अनुषंगाने 20 मे जागतिक मधमाशी दिनानिमित्त चिंचाळा ता. बिलोली येथील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. डॉ. कृष्णा अंभुरे यांनी शेतकऱ्यांना मधमाशांचे शेतीमधील महत्व सांगताना मधापेक्षा विविध पिकांच्या परागीकरणात मधमाशांचे मोठे योगदान आहे याबद्दल मार्गदर्शन केले. मधमाशांचे संवर्धन करण्यासाठी रासायनिक कीटकनाशकांचा वापर कमी करुन एकात्मिक किड व रोग व्यवस्थापन करणे गरजेचे आहे असे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले. #beeday🐝 #WorldBeeDay #BeeDay #bee #savethebees #agriculture
0 notes
kvksagroli · 1 day
Text
Tumblr media Tumblr media
बिलोली येथे पशुसंवर्धन विभाग, बीसीआरसी आणि कृषि विज्ञान केंद्र, सगरोळी यांच्या संयुक्त विद्यमाने आपल्या पशुसखी आणि शासनाच्या ‘मैत्री‘ प्रकल्प अंतर्गत कार्यरत असणारे पशुधन पर्यवेक्षक यांचा प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात सहभागी विस्तार कार्यकर्त्यांना शासनाच्या महत्त्वाकांक्षी "पशुधन नोंदणी अभियान" बाबत माहिती देण्यात आली. या कार्यक्रमाअंतर्गत महाराष्ट्रातील सर्व पशूंची नोंदणी शासन स्तरावर करून त्यांना आधार क्रमांकाच्या धर्तीवर १२ अंकी बिल्ला क्रमांक देण्यात येणार आहे. यासाठी पशुसखी आणि पशुधन पर्यवेक्षक यांना घरोघरी जाऊन प्रत्येक पशुधनाच�� रीतसर नोंदणी घेऊन त्या प्रत्येक पशुधनाच्या कानामध्ये बिल्ले लावण्यात येणार आहेत. तसेच सदरील पशुधन हे पशुमालकाच्या नावाने त्यांच्या मोबाईल क्रमांक द्वारे जोडले जाणार आहे. म्हणजे भविष्यात प्रत्येक पशुधनाची ओळख त्याच्या बिल्ला क्रमांक आणि मालकाच्या नावावर शासनाकडे राहणार आहे. या कार्यक्रमात गाय वर्गीय, म्हैस वर्गीय आणि शेळी तसेच मेंढी यांची नोंद करणे आवश्यक आहे. म्हणूनच या सर्व प्रशिक्षणार्थींना याबाबत सखोल माहिती देऊन त्यांना कोणत्या पद्धतीने माहिती जमा करावी आणि बिल्ले कसे वापरायचे याबाबत माहिती देण्यात आली. या कार्यक्रमात आलेल्या विस्तार कार्यकर्ते सोमवार पासून बिलोली आणि नायगाव तालुक्यातील पशुधनाची नोंद घेण्यासाठी सुरुवात करतील. पशुपालकांना आव्हाहन आहे की, आपण आपल्या सर्व पशुधनाची नोंद आवश्य करून घ्यावी. येत्या १ जून पासून पशूंच्या खरेदी विक्री व्यवहार करण्यासाठी बिल्ले आवश्यक आहेत. तसेच पशुवैद्यकीय दवाखान्यातून मिळणाऱ्या सर्व सुविधा जसे की लसीकरण, उपचार आणि कृत्रिम रेतन इ. करिता बिल्ले असणे बंधनकारक राहणार आहे. #animals #animallover #agriculture #farmer #मैत्री #पशुप्रेमी #पशुधन_नोंदणी_अभियान #बिल्ले
0 notes
kvksagroli · 22 days
Video
youtube
लागवडी करिता आंबा कलम निवडताना घ्यावयची काळजी #mango #grafts #plantation...
0 notes
kvksagroli · 27 days
Text
Tumblr media Tumblr media
परसबागेतील कुक्कुटपालन कृषि विज्ञान केंद्र, सगरोळी येथे एकदिवसीय परसबागेतील कुक्कुटपालन या विषयावर प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात सगरोळी गावामधील निवडलेले लाभार्थ्यांना सुधारित कोंबड्या वापरून परसबागेतील कुक्कुटपालन करण्याविषयी माहिती देण्यात आली. यामध्ये खाद्य कोणते आणि कसे वापरावे? पाण्याचे व्यवस्थापन, रात्रीच्या वेळी निवाऱ्याची व्यवस्था कशी करावी? औषधे कोणते आणि कसे वापरायचे याबाबत माहिती देण्यात आली. तसेच कृषि विज्ञान केंद्रामध्ये संगोपन करून मोठे केलेल्या एक महिना वयाचे सुधारित जातीची कुक्कुटपिल्ले या लाभार्थ्यांना देण्यात आले. या पक्षांची काळजी घेऊन त्यांच्यापासून उत्पन्न मिळवण्याचे आव्हाहन याप्रसंगी करण्यात आले. एकूण २३ प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते. #animals #poultryfarming #poultryfarm #backyardpoultry #कुक्कुटपालन🐥🐔😍👑
0 notes
kvksagroli · 27 days
Text
Tumblr media Tumblr media
अक्षतृतीया निमित्त अमृतालाम् सीडस कडून बीजपूजन या कृषि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन व बियाणे विक्रीचा शुभारंभ... अक्षतृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त समजला जातो. या शुभ मुहूर्तावर बीजपूजन करून बियाणे विक्री या कार्यक्रमाचे आयोजन अमृतालम शेतकरी उत्पादक कंपनीकडून करण्यात आले होते . अमृतालयम् शेतकरी उत्पादक कंपनी कृषी विज्ञान केंद्र सगरोळीच्या मार्गदर्शनाखाली सोयाबीन, तूर, हरभरा, करडई इत्यादी पिकाचे बीजउत्पादन घेते. याप्रसंगी कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ प्रा. कपिल इंगळे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना सोयाबीन व तूर बीज उत्पादन याविषयी मार्गदर्शन करून व जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी बीजउत्पादनात सहभागी व्हावे असे आवाहन केले. याप्रसंगी बेळकोणी व परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती नोंदवली. #कृषि #अक्षतृतीया #बीजपूजन #बियाणे #विक्री #FPO #सोयाबीन #तूर #हरभरा #करडई #बीज #उत्पादन
0 notes
kvksagroli · 27 days
Text
Tumblr media
संस्कृति संवर्धन मंडळ संचालित कृषि विज्ञान केंद्र, सगरोळी प्रक्षेत्रावर भारतीय हवामान विज्ञान विभाग, पृथ्वी विज्ञान मंत्रालय, भारत सरकार, यांच्या सौजन्याने स्वयंचलित हवामान केंद्र ( ए.डब्ल्यू.एस (AWS) ऑटोमॅटिक वेदर स्टेशन) बसवण्यात आले आहे.
☁🌡🌤❄🌦🌥🌨
या ए.डब्ल्यू.एस (AWS) च्या साह्याने आपल्याला भागातील २० किलोमीटर परिघातील प्रदेशाच्या तत्कालीन हवामानाची माहिती कळणार आहे. ज्यामध्ये वाऱ्याचा वेग, वाऱ्याची दिशा, पर्जन्यवृष्टी, पाऊस, तापमान इत्यादी गोष्टी आपल्याला आय.एम.डी च्या वेबसाईटवर प्रत्येक चार तासाला अद्यावत होत राहणार आहे. तसेच दैनंदिन माहिती पण पाहता येणार आहे. या माहितीच्या आधारे कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ शेतकऱ्यांना कृषी सल्ला देणार आहेत. आपल्या भागातील शेतकऱ्यांना, सामान्य लोकांना आय.एम.डी. च्या वेबसाईटवर आतापर्यंतचा डेटा लाईव्ह दिसणार आहे आणि त्यांना याचा फायदा होणार आहे. #AWS#Agro#Automatic#Weather#Stations#KrishiVigyanKendra#sagroli#nanded
0 notes
kvksagroli · 29 days
Text
Tumblr media Tumblr media
कमी किमतीत उच्च पोषकतत्वे.... संस्कृती संवर्धन मंडळ संचलित कृषी विज्ञान केंद्र, सगरोळी... तृणधान्य विशेषतः ज्वारी आणि नाचणी यांचा रोजच्या आहारातील समावेशामुळे अनेक सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे होणारे आजार कमी होतात. ज्वारी आणि नाचणी यांच्यामध्ये महत्त्वाची पोषक तत्वे विशेषतः सूक्ष्म पोषकतत्वे भरपूर प्रमाणामध्ये आहेत. तसेच यांची किंमत देखील कमी आहे. म्हणून प्रत्येकाला सहज परवडेल असे पोषक अन्न आहे. शेतकरी हे तृणधान्य त्यांच्या शेतामध्ये सहज कमी खर्चात उत्पादन घेऊ शकतात. या दोन्ही धान्यांबद्दल अधिक ची माहिती देण्यासाठी व त्याची प्रक्रिया दाखवण्यासाठी गंगनबीड तालुका कंधार येथे प्रशिक्षण कार्यक्रम घेन्यात आला. गंगनबीड हे गाव संस्थेच्या जीवा प्रकल्पाच्या अंतर्गत नैसर्गिक शेतीचे गाव आहे. महिलांना ज्वारी आणि नाचणी पासून विविध पौष्टिक खाद्यपदार्थ तयार करून दाखवण्यात आले व त्याची सवि��्तर माहिती देण्यात आली. तसेच पोखरभोसी या गावामध्ये महिलांनी सुरू केलेला हळद प्रक्रिया उद्योग भेट देऊन चर्चा केली. #womenempowerment #agriculture #KrishiVigyanKendra #womenownedbusiness #womeninbusiness #skills #milletsnacks #millets
0 notes
kvksagroli · 29 days
Text
Tumblr media
उमरज येथे संस्कृती संवर्धन मंडळ, कृषी विज्ञान केंद्र, सगरोळी आणि राष्ट्रीय कृषि विकास बैंक(नाबार्ड) यांच्या संयुक्त विद्यामानाने प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमामध्ये डॉ. संतोष चव्हाण यांनी उपस्थित शेतकर्यना कागदी लिंबू आणि सीताफळ लागवड या विषयी सविस्तर मार्दर्शन करण्यात आले. सदरील पिक लागवड करतना जमिनीची निवड, पूर्व तयारी, रोपांची निवड, बागेची आखणी करणे, लागवड करणे, लागवड खर्च आणि उत्पन या बद्दल माहिती दिली. या कार्यक्रमास एकूण २४ शेतकरी उपस्थित होते. कार्यकर्माचे सूत्र संचालन प्रदिपकुमार भिसे (कृषितज्ञ) यांनी केले. #KrishiVigyanKendra #agriculture #kvksagroli #शेती #fruits #NABARD #नाबार्ड #लिंबू #सीताफळ #लागवड🌳
0 notes
kvksagroli · 29 days
Text
Tumblr media
Mango Plant for #sale #Agriculture #Product at #KrishiVigyanKendra #kvk #Sagroli #farmer #farm #शेती #agri #agritech #agricultureworld #AzadiKaAmritMahotsav #Nanded #mango #plant #nursery #fruits #शासनमान्य_रोपवाटिका
0 notes
kvksagroli · 29 days
Text
Tumblr media Tumblr media
गारमेंट उद्योग न थांबणारा उद्योग... रेडीमेड ड्रेसेस तयार करणे हा एक साधा सरळ पण नियमित आर्थिक उत्पन्न मिळवण्याचा एक शाश्वत उद्योग आहे. यामुळे महिलांचा या उद्योगाकडे कल जास्त असतो. संस्कृती संवर्धन मंडळ संचलित कृषी विज्ञान केंद्राच्या अंतर्गत चालू असलेला तेजस्विनी गारमेंट सेंटर हा एक आदर्श उद्योगाचे उदाहरण महिलांसाठी झाले आहे. म्हणूनच आज दिनांक 4 मे 2024 रोजी नांदेड येथील महिलांचा एक गट तेजस्विनी गारमेंट सेंटर मध्ये प्रशिक्षण घेण्यासाठी आला. रेडीमेड गारमेंट तयार करण्याच्या पद्धती , येथील व्यवस्थापन, मार्केटिंग याबद्दल सविस्तर मार्गदर्शन महिलांना करण्यात आले. प्रशिक्षणासाठी आलेल्या महिलांनी नांदेड येथ�� एक छोटासा उद्योग सुरू केला आहे. या उद्योगाच्या पुढील वाटचालीसाठी सदरील प्रशिक्षण त्यांना देण्यात आले. #womensfashion #RuralWomenEmpowerment #Dress #stiching #kvksagroli #nanded
1 note · View note
kvksagroli · 29 days
Text
Tumblr media
कंधार - घोडज येथे संस्कृती संवर्धन मंडळ, कृषी विज्ञान केंद्र, सगरोळी आणि राष्ट्रीय कृषि विकास बैंक(नाबार्ड) यांच्या संयुक्त विद्यामानाने प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. सदरील कार्यक्रमात डॉ. संतोष चव्हाण यांनी फळबाग लागवड आणि पूर्व तयारी करणे जसे जमिनीची निवड, माती परीक्षण, बागेची आखणी, फळपिक व रोपांची निवड या विषयी साव्स्थीर माहिती देण्यात आली याबरोबर जमीनीतील सेंद्रीय कर्ब वाढवण्यासाठी करावयाच्या उपाय योजना जसे सेंद्रिय खते, जीवाणू खते हिरवळीची खते यांचा यौग्य वापर करणे या विषयी सविस्थर माहिती दिली. या कार्यक्रमास एकूण ३४ शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमासकार्यकर्माचे सूत्र संचालन प्रदिपकुमार भिसे (कृषितज्ञ) यांनी केले. #farm #farmer #agriculture #kvksagrol #Kandhar
0 notes
kvksagroli · 29 days
Text
Tumblr media
कंधार - घोडज येथे संस्कृती संवर्धन मंडळ, कृषी विज्ञान केंद्र, सगरोळी आणि राष्ट्रीय कृषि विकास बैंक(नाबार्ड) यांच्या संयुक्त विद्यामानाने प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. सदरील कार्यक्रमात डॉ. संतोष चव्हाण यांनी फळबाग लागवड आणि पूर्व तयारी करणे जसे जमिनीची निवड, माती परीक्षण, बागेची आखणी, फळपिक व रोपांची निवड या विषयी साव्स्थीर माहिती देण्यात आली याबरोबर जमीनीतील सेंद्रीय कर्ब वाढवण्यासाठी करावयाच्या उपाय योजना जसे सेंद्रिय खते, जीवाणू खते हिरवळीची खते यांचा यौग्य वापर करणे या विषयी सविस्थर माहिती दिली. या कार्यक्रमास एकूण ३४ शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमासकार्यकर्माचे सूत्र संचालन प्रदिपकुमार भिसे (कृषितज्ञ) यांनी केले. #farm #farmer #agriculture #kvksagrol #Kandhar
0 notes
kvksagroli · 29 days
Text
Tumblr media
#agricultureindia #agriculture #animals #care
0 notes
kvksagroli · 1 month
Text
Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media
काटकळंबा गावात यांत्रिकीकरणाद्वारे जमीन आणि जलसंधारणावर लक्ष केंद्रित करणारे प्रशिक्षण. KVK सगरोळी येथील कृषी अभियांत्रिकी विभागातील विषय विशेषज्ञ डॉ. प्रियंका खोले यांनी काटकळंबा गावात यांत्रिकीकरणाद्वारे जमीन आणि जलसंधारणावर लक्ष केंद्रित करणारे प्रशिक्षण सत्र आयोजित केले. प्रशिक्षणात कापसाचे अवशेष जाळण्याचा अवलंब न करता मातीचा पोत वाढवण्यासाठी वापरण्यावर भर देण्यात आला. डॉ.प्रियांका खोले यांनी यासाठी ट्रॅक्टरवर चालणाऱ्या श्रेडिंग मशीनच्या वापराचे प्रात्यक्षिक दाखविले. या पध्दतीचा उद्देश जमिनीची सुपीकता वाढवणे, कार्���नचे प्रमाण वाढवणे, ओलावा टिकवून ठेवणे, पोषक घटकांची पातळी वाढवणे आणि शेवटी पीक उत्पादनात सुधारणा करणे आणि कीटक समस्या कमी करणे आणि त्यानंतरच्या पिकांमध्ये खतांचा खर्च कमी करणे हे आहे. 30 हून अधिक शेतकऱ्यांच्या संख्येने उपस्थितांनी हे प्रात्यक्षिक पाहिले. याव्यतिरिक्त, डॉ. निहाल मुल्ला यांनी सत्रादरम्यान महिला सहभागींना शेळीपालनाविषयी माहिती दिली. #farm #machinery #agriculture #kvksagroli #farmer #tools #अभियांत्रिकी
1 note · View note